आमदार आवताडेंना धक्का; 'दामाजी'च्या आखाड्यात विरोधकांना आघाडी

पहिल्या फेरीत समविचारी गटाचे उमेदवार आघाडीवर.
BJP MLA Samadhan Awatade Latest News
BJP MLA Samadhan Awatade Latest News Sarkarnama

मंगळवेढा : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. पहिल्याच फेरीत आमदार समाधान आवताडे यांना धक्का बसला आहे. या फेरीत समविचारी गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले. त्यामुळे आता इतर तीन फेरींच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहेत. (Samadhan Autade Latest News)

कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे. भाजपचे (BJP) आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी तालुक्यातील 108 मतदान केंद्रावर 28695 पैकी 24521 मतदारांनी हक्क बजावत चुरशीने मतदान केले. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आमदार आवताडे यांच्या गटाविरोधात तालुक्यातील सर्व नेते समविचारी गटाच्या रूपाने एकत्रित आले आहेत.

BJP MLA Samadhan Awatade Latest News
शिंदे सरकारचं महाराष्ट्राला पहिलं मोठं गिफ्ट; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत मंगळवेढा, उचेठाण, कचरेवाडी, मुढवी, भालेवाडी , धर्मगाव, मुंढेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, माचणूर, बठाण या गावांची मतमोजणी झाली. त्यामध्ये आमदार समाधान आवताडे 2993, नीला आटकळे 2726, दिलीप जाधव 71, मुरलीधर सखाराम दत्तू 3117, गौरीशंकर बुरकुल 3014, गोपाळ भगरे 3001, मारुती वाकडे 31, राजेंद्र सुरवसे 2479 एवढी मतं मिळाली.

ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गटात सचिन चौगुले 2741, राजेंद्र चरणू पाटील 3317, राजेंद्र सर्जेराव पाटील 2815, भारत बेदरे 3129, अशोक भिंगे 2623, दयानंद सोनगे 3008 मतं मिळाली. तर 248 मतं बाद झाली. मरवडे ऊस उत्पादक गटात प्रदीप खांडेकर 2890, गणेश पाटील 2752, बसवेश्वर पाटील 2691, शिवानंद पाटील 3276, रेवणसिद्ध लिगाडे 3058, औदुंबर वाडदेकर 3104 इतकी मतं मिळाली.

BJP MLA Samadhan Awatade Latest News
'मविआ'ला झटका; सरपंच-नगराध्यक्षांच्या निवडीबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

भोसे ऊस उत्पादक गटात उमाशंकर कनशेट्टी यांना 2818, अंबादास कुलकर्णी 2826, भीवा डोलतोडे 3189, बसवराज पाटील 3169, गौडाप्पा बिराजदार 3057, आबा बंडगर 2700 मतं तर आंधळगाव ऊस उत्पादक गटात नवनाथ आसबे 37, प्रकाश भिवाजी पाटील 3211, दिगंबर भाकरे 3118, सुरेश भाकरे 2870, महादेव लुगडे 3031, विनायक यादव 2724, बाळासो शिंदे 2664 इतकी मतं मिळाली. या गटात 222 मतं बाद झाली.

महिला राखीव गटातून निर्मला काकडे यांना 3193, लता कोळेकर 387, कविता निकम 2795, स्मिता म्हमाने 2700 मतं मिळाली. या गटात 249 मतं बाद करण्यात आली. मागासवर्गीय मतदार संघात तानाजी कांबळे यांना 3122 तर युवराज शिंदे यांना 2905 मंत आणि भटक्या विमुक्त जाती मतदार संघात तानाजी खरात यांना 3307 आणि विजय माने यांना 2780 मतं मिळाली. आता उर्वरित तीन फेऱ्यांकडे तालुक्याचे लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in