दामाजी कारखाना निकाल : दुसऱ्या फेरीत समविचारीची आघाडी; चुरस वाढली...

Damaji Sugar Factory Election Results : पहिल्या फेरीत समविचारी गटाच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उधळण केली.
Damaji Sugar Factory Election Results Latest News
Damaji Sugar Factory Election Results Latest NewsSarkarnama

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Damaji Sugar Factory Election) पहिल्या फेरीतील समविचारीची आघाडीला मिळालेली आघाडी दुसऱ्या फेरीत ही कायम राहिली उर्वरित दोन फेरीनंतर दामाजीचा सत्ताधारी कोण हे स्पष्ट होणार आहे. (Damaji Sugar Factory Election Results Latest News)

Damaji Sugar Factory Election Results Latest News
आमदार आवताडेंना धक्का; 'दामाजी'च्या आखाड्यात विरोधकांना आघाडी

आज सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीत समविचारी गटाच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उधळण करण्यात आली व फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये मंगळवेढा ऊस उत्पादकातील ऊस उत्पादक गटातील बहुतांश गावे व ब्रह्मपुरी उस उत्पादक गटातील काही गावांचा समावेश होता परंतु या पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाला आघाडी मिळणे अपेक्षित होते परंतु याच गटात सत्ताधारी गटांना आघाडी मिळाली नाही पहिल्या फेरीत समविचारी गटाला मिळालेली आघाडी दुसऱ्या फेरीत कायम राहिली दुसऱ्या फेरीत ब्रह्मपुरी ,सिद्धापूर ,आरळी, तांडोर, तर मरवडे ऊस उत्पादक गटातील मरवडे, नंदुर, भाळवणी, जंगलगी/बावची,रड्डे, जालीहाळ, फटेवाडी, जित्ती/निंबोणी, खोमनाळ, येड्राव बालाजीनगर/कागष्ट या गावांची मतमोजणी करण्यात आली.

Damaji Sugar Factory Election Results Latest News
नगरसेवक, जिल्हाप्रमुख ते थेट 'मातोश्री'ला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर...

दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते कंसात दुसऱ्या फेरीअखेरील मते पुढील प्रमाणे

आ. समाधान आवताडे 2512(5505), नीला आटकळे 2441(5167), दिलीप जाधव 78 (149), मुरलीधर दत्तू 3503(6620), गौरीशंकर बुरकुल 3492 (6506), गोपाळ भगरे 3434 (6435), मारुती वाकडे 11 (42) राजेंद्र सुरवसे 2219 (4698) बाद 323(648)

ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गट

सचिन चौगुले 2555(5296) राजेंद्र चरणू पाटील 3520 (6837), राजेंद्र सर्जेराव पाटील 2491 (5306) भारत बेदरे 3357(6486) अशोक भिंगे 2441(5064), दयानंद सोनगे 3386 (3394), बाद मते 295(543),

मरवडे ऊस उत्पादक गट

प्रदीप खांडेकर 2595(5485), गणेश पाटील 2529(5281) , बसवेश्वर पाटील 2360(5051) ,शिवानंद पाटील 3627(6903) ,रेवणसिद्ध लिगाडे 3407(6465),औदुंबर वाडदेकर 3441(6545) बाद मते 255(494)

भोसे ऊस उत्पादक गट

उमाशंकर कनशेट्टी 2495(5313), अंबादास कुलकर्णी 2483(5309), भीवा दौलतोडे 3573(6762) ,बसवराज पाटील 3559(6728) , गौडाप्पा बिराजदार 3478(5635) आबा बंडगर 2382(5082)

आंधळगाव ऊस उत्पादक गट

नवनाथ आसबे 20(87) , प्रकाश भिवाजी पाटील 3563(6774) , दिगंबर भाकरे 3512(6730), सुरेश भाकरे 2512(5382), महादेव लुगडे 3407(6438) , विनायक यादव 2452(5176)बाळासो शिंदे 2376(5040) बाद मते 255 (477)

महिला राखीव निर्मला काकडे 3598(6791),लता कोळेकर 3545(6632) कविता निकम 2419(5214), स्मिता म्हमाने 2362(5062),बाद मते 267(516) ,

मागासवर्गीय मतदार संघ तानाजी कांबळे 3569(6691) युवराज शिंदे 2536(5441) बाद मते 207(400)

भटक्या विमुक्त जाती मतदार संघ तानाजी खरात 3647(6954) विजय माने 2513(5293) बाद मते 185(318)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com