Babanrao Avtade -MLA Samadhan Avtade
Babanrao Avtade -MLA Samadhan AvtadeSarkarnama

दामाजी कारखाना निवडणूक : आमदार समाधान आवताडेंना काकाच देणार आव्हान?

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सहकारी संस्था मतदारसंघातून संचालक असलेले ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी आपला अर्ज मागे घेत या गटाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवली आहेत.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सहकारी संस्था मतदारसंघातून संचालक असलेले ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे (Babanrao Avtade) यांनी आपला अर्ज मागे घेत या गटाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवली आहेत. या मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव तथा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढवत आहेत. असे असले तरी बबनराव आवताडे यांनी मंगळवेढा (Mangalveda) ऊस उत्पादक गटातील आपला अर्ज कायम ठेवला आहे. याच गटातून कारखान्याचे अध्यक्ष आणि त्यांचे पुतणे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनीही अर्ज भरला आहे. त्यामुळे दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत (Damaji sugar Factory Election) चुलता- पुतण्यामधील लढाई मंगळवेढाकरांना पहायला मिळू शकते. त्यासाठी माघारीचा अंतिम दिवस असलेल्या २७ तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. (Damaji factory election : Uncle Babanrao Avtade to challenge MLA Samadhan Avtade?)

बबनराव आवताडे यांचा अर्ज संस्था मतदारसंघातून मागे घेतला असला तरी मंगळवेढा ऊस उत्पादक गटात त्यांचा अर्ज आहे. कारखान्याच्या सत्ताधारी गटाचे आमदार समाधान अवताडे हे यापूर्वी याच गटात गटातून विजयी झाले आहेत. आता त्यांनी याच गटातून अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे मंगळवेढा ऊस उत्पादक गटाची निवडणूक राज्यभर गाजण्याची शक्यता आहे.

Babanrao Avtade -MLA Samadhan Avtade
'सदाभाऊ, तुमच्या उधारीची पावती, राष्ट्रवादीच्या नावावर का फाडता?'

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपाची व्यवस्था व्हावी; म्हणून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. स्थापनेपासून प्रशासकीय राजवटीचा काळ वगळता बबनराव आवताडे हे आजतागायत संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आहेत. एक दोन वेळा या प्रवर्गाच्या निवडणुकादेखील झाल्या. पण, तालुक्यातील सहकारी संस्थांवर एकहाती वर्चस्व असल्यामुळे त्या निवडणुकीतही ते एकतर्फी विजयी झाले होते.

Babanrao Avtade -MLA Samadhan Avtade
पाथर्डीत शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडे देणार भाजपला संदेश...

बबनराव आवताडे यांचे चिंरजीव तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनीदेखील युवकांचे मोठे संघटन उभारले आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून त्यांनी तूर, मका, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्र सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीचा दर देण्याचा प्रयत्न केला आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. मात्र, नवखे आणि कमी कालावधीमुळे त्यांचा पराभव झाला. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील वाढती उपस्थिती त्यांच्या राजकीय प्रभाववाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.

Babanrao Avtade -MLA Samadhan Avtade
पंचायतराज समितीच्या पाहुणचारासाठी 3 कोटी गोळा केले..? विक्रम काळेंनी कानावर हात ठेवले!

सध्या तालुक्यातील राजकीय आखाड्यात सुरू झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी संस्था मतदारसंघातून बबनराव आवताडे यांच्याबरोबर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे व इतर पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी तिघांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतली. आतापर्यंत बबनराव आवताडे यांना कारखान्याच्या निवडणुकीत सहकारी संस्था गटात अनेक वेळा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाल. मात्र, त्यावर मात करत आवताडे यांन या गटातील आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

Babanrao Avtade -MLA Samadhan Avtade
समाधान आवताडेंनी पहिला डाव जिंकला... समविचाराचे ३६ अर्ज पहिल्या झटक्यात बाद!

या आखाड्यात सध्या चौघे असले तरी बबनराव आवताडे यांनी आपली पूर्ण ताकद सिद्धेश्वर आवताडे यांच्या पाठीशी उभे केली आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी २७ जून असला तरी या कालावधीमध्ये या प्रवर्गाची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com