दहिवडी सोसायटी : राष्ट्रवादीला रोखण्यासाठी गोरे बंधूंचे गट एकत्र

दहिवडी Dahiwadi सोसायटीवर Society राष्ट्रवादीचे NCP वर्चस्व राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादीने शेखर गोरे Shekhar Gore यांच्या नेतृत्वाखाली लढवून जिंकली होती.
दहिवडी सोसायटी : राष्ट्रवादीला रोखण्यासाठी गोरे बंधूंचे गट एकत्र
Shekhar Gore, Prabhakar Deshmukh, Jaykumar Goresarkarnama

दहिवडी : कित्येक ग्रामपंचायतींपेक्षा जास्त म्हणजेच २८५८ मतदान असलेल्या माण तालुक्यातील दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वर्षांनुवर्षांची सत्ता अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादीने तर सत्तांतर करण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरसावली आहे. यावेळेस राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी आमदार जयकुमार गोरे गट व शेखर गोरे गट एकत्र आले आहेत.

दहिवडी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुक राष्ट्रवादीने शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवून जिंकली होती. मात्र, त्यानंतर शेखर गोरे शिवसेनेत गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सोसायटीवर शिवसेनेची सत्ता आली होती. यावेळी राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी आमदार जयकुमार गोरे गट व शेखर गोरे गट एकत्र आले आहेत.

Shekhar Gore, Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा...जयकुमार गोरे

प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावंत, रामभाऊ पोळ, दादासाहेब जाधव, सुनिल पोळ, तानाजी जाधव, बाळासाहेब गुंडगे, सुरेश इंगळे, व राष्ट्रवादीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या नेतृत्वाखालील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी शेतकरी विकास पॅनेल निवडणुकीला सामोरे जात आहे.

Shekhar Gore, Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

तर आमदार जयकुमार गोरे व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल जाधव, धनाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, सिध्दार्थ गुंडगे, राजेंद्र जाधव, राजेंद्र खांडे, रविंद्र जाधव व भाजप आणि शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या नेतृत्वाखालील श्री सिध्दनाथ ग्रामविकास पॅनेल निवडणूकीच्या मैदानात उतरले आहे. अपक्ष सुध्दा आपले नशीब अजमावत आहे.

Shekhar Gore, Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
प्रभाकर देशमुखांची खेळी यशस्वी; दहिवडी, वडूज नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता

दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार करण्यात येत असून प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. जाहिरातीचे फ्लेक्स, पत्रिका व वाहनांवरील ध्वनीयंत्रणेच्या सहाय्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रविवार २४ एप्रिल रोजी मतदान होणार असून उर्वरित दिवसांमध्ये साम, दाम, दंड, भेद याचा पुरेपूर वापर केला जाण्याची शक्यता आहे.

Shekhar Gore, Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

क्रॉस मतदानाचा फटका

माणमध्ये आतापर्यंत झालेल्या सोसायटी निवडणुकांपैकी बहुतांशी निवडणुकांमध्ये क्राॅस मतदानमुळे सत्ता येण्याचा व जाण्याचा प्रकार घडला आहे. दहिवडी सोसायटीत सुध्दा क्राॅस मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत दोन्ही पॅनेल काय उपाययोजना करणार यावर निकाल अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.