शिवसेना खासदाराच्या मातोश्री भाजप सोबत अन् कार्यकर्त्यांनी दिला इशारा

आता स्वार्थी नेते विरूध्द स्वाभिमानी शिवसेना कार्यकर्ते अशी लढाई सुरु झाली आहे.
Dhairyashil Mane, Nivedita Mane

Dhairyashil Mane, Nivedita Mane

sarkarnama

कोल्हापूर : शिवसेनेच्या (Shiv Sena) जीवावर आमदार, खासदार व मंत्री झालेले लोक शिवसेनेला सोडून विरोधकांसोबत कोल्हापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवत (Kolhapur District Bank Election) आहेत. अशांना लाज वाटली पाहिजे, अशी टिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज (ता.२४) केली. जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

<div class="paragraphs"><p>Dhairyashil Mane, Nivedita Mane</p></div>
आदित्य ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात; सुशांतसिंहचा फॅन असल्याचा दावा

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेतून खासदार झालेल्यांच्या मातोश्री व आमच्या भगिनी माजी खासदार निवेदिता माने यांनी मागचा सर्व इतिहास विसरून भाजपसोबत गेलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सोबत दिली आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे. शिवसेनेच्याच खासदारांच्या मातोश्री भाजपसोबत जातात, हे दुदैवी आहे. ज्यावेळी त्यांच्याकडे काही नव्हते त्यावेळी शिवसेनेने त्यांना मिळवून दिले. त्या हे सोयीस्कररित्या विसरल्या आहेत. आता स्वार्थी नेते विरूध्द स्वाभिमानी शिवसेना कार्यकर्ते अशी लढाई सुरु झाली आहे.

शिवसेनेने ज्यांना मंत्रीपद दिले तेही शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक न लढता सत्तारूढ गटाच्या चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीनेही या निवडणुकीत पुढाकार घेतला पाहिजे. विरोधकांसोबत गेलेल्यांना लाज वाटली पाहिजे. मात्र, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत निश्‍चितपणे आपला विजय होणार, यात शंका नसल्याचा विश्‍वासही पवार यांनी व्यक्त केला.

जि.प.चे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, आपल्या पक्षातून चे आमदार, खासदार झाले ते पक्षाकडे पाहत नाहीत. शिवसेनेचा केवळ स्वार्थासाठी उपयोग घेतात, अशा लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे. आता भविष्यात हे चालू देणार नाही. अशा इशाराही पाटील यांनी दिली. आमच्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेच अस्तित्व आहे. असे कोणालाही वाटू नये. यासाठी, खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक खूप मनावर घेतली आहे. शिवसैनिकांनी प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे, अशा सूचनाही मंडलिक यांनी दिल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Dhairyashil Mane, Nivedita Mane</p></div>
हसन मुश्रीफ यांनी त्या लढतीसाठी तीन वर्षे तयारी केली... पण

गावागावात संस्था स्थापन करा

जिल्ह्यात गावागावात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकारी संस्था सुरु झाल्या पाहिजेत. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात आपला दबदबा वाढू शकतो. सरकार आपले आहे. त्यामुळे जेवढण्या म्हणून संस्था काढता येतील तेवढ्या उभारून सर्वसामान्यांची मदत करा, असेही मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी निवेदिता माने यांना स्वत:ची मुलगी म्हणून ओळख दिली. राजकारणासह सर्वच क्षेत्रात मदत करण्याची ग्वाहीही दिली होती. मात्र, माजी खासदार माने हे आता विसरल्या असल्याची टिका पवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com