Raju Shetty
Raju Shettysarkarnama

Satara News : 'महाविकास'च्या सभातून विरोधकांचे वस्त्रहरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन...राजू शेट्टी

Raju Shetty माजी खासदार राजू शेट्टी आज सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Satara News : सध्या राज्यभर महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi सभा सुरु असून विरोधकांनी आपली बाजू मांडली पाहिजे. पण, या सभांतून एकमेकांचे वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सभांतील भाषणांत मते मांडली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली असती. पण, ही मंडळी ईडीने ED भेदरलेली असल्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापलिकडे काहीही दिसत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetty यांनी केली.

माजी खासदार राजू शेट्टी आज सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या सभा सुरु आहेत, याविषयी विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, सभांच्या माध्यमातून विरोधकांनी बाजू मांडली पाहिजे.

या सभांतून एकमेकांची वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांचे नुकसान, बियाणे, औषधे व खतांचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, तसेच शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर चर्चा व भाषणे झाली असती, तर शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली असती. मुळात ही मंडळी ईडीने भेदरलेली आहेत. त्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करायचे या पलिकडे महाराष्ट्रात काहीही चालले नाही.

Raju Shetty
Raju Shetty News : दिलेला शब्द पाळा, अन्यथा...; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

सध्या दिल्लीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत, याविषयी बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, यावर बोलण्यात मला अजिबात रस नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी व व्यापारी, हमाल दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे.

Raju Shetty
Satara News : शिवेंद्रसिंहराजे संतप्त : कास परिसरातील बांधकामे पाडल्यास आंदोलन करणार...

हे पॅनेल निवडून आल्यानंतर बाजार समितीत सुरु असलेल्या उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढल्या जातील, असे सांगून राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोकळीक देण्यासाठी हे पॅनेल उभे केले आहे. ही निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. त्रास दिला गेला. पण, आम्ही लढणारी माणसे असून रडणारी नाही. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही धमकीला भीक घातली नाही, असे त्यांनी सांगितले

Raju Shetty
Pune Political News : गावकारभाराचा अनोखा 'भुकूम पॅटर्न'; बहीण सरपंच तर भाऊ उपसरपंच! पाहा फोटो...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com