मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने 'स्वाभिमानी'कडून डमी एकनाथ शिंदेंना निवेदन...

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे फक्त गणपती आरत्या आणि आपल्या आमदाराच्या स्नेहभोजन कार्यक्रमात व्यस्त आहेत.
Swabhimani Shetkari Sanghatna, Ranjit Bagal
Swabhimani Shetkari Sanghatna, Ranjit BagalSarkarnama

पुणे : राज्याचे खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या गणपती आरत्या आणि आपल्या गटाच्या आमदारांच्या स्नेहभोजनातच व्यस्त असतात. तसेच ते राजकीय दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. याबरोबरच आगामी पितृपक्ष आणि नवरात्री उत्सवात देखील ते दर्शनासाठी व्यस्त असू शकतात. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatna) वतीने संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल (Ranjit Bagal) यांनी चक्क मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखे दिसणारे आणि डमी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेले पंढरपूर येथील पांडुरंग शिंदे यांना प्रतिकात्मक निवेदन देत मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका केली आहे. (Swabhimani Shetkari Sanghatna, Ranjit Bagal Latest News)

Swabhimani Shetkari Sanghatna, Ranjit Bagal
अमृता फडणवीसांना फेसबुकवर शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक; 'आयपी अ‍ॅड्रेस' तपासल्यावर...

रणजित बागल यांनी डमी मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री महोदय सध्या राजकीय दौर्‍यामध्ये प्रचंड व्यस्थ आहेत, त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयी लक्ष देण्यास वेळ मिळत नसावा. मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महत्या करून दखील ते शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत.

ते मागील पंधरा दिवसांपासून फक्त गणपती आरत्या आणि आपल्या गटाचे आमदाराच्या स्नेहभोजन कार्यक्रमात व्यस्त आहेत. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे? असा सवाल करत बागल यांनी आज डमी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिकात्मकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी करत मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला आहे.

Swabhimani Shetkari Sanghatna, Ranjit Bagal
Shivsena : दानवे चकवा अन् भुमरे बोका ; खैरेंनी उडवल्ली खिल्ली..

राज्यात सध्या जनावरांवर आलेल्या लंपी स्कीन रोगाने हाहाकार उडाला आहे. तसेच राज्यभरात अनेक भागात अतिवृष्टी व काही भागात अवर्षण झाले. मात्र पिकविमा कंपनीने पर्जन्यमानात घोळ करून शेतकर्‍यांना पिकविम्यापासुन वंचित ठेवण्याचा डाव आखला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदय गंभीर नाहीत. म्हणून डमी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्यावर तरी खरे मुख्यमंत्री शिंदे दखल घेतील अशी अपेक्षा यानिमित्ताने बागलांनी व्यक्त केली.

Swabhimani Shetkari Sanghatna, Ranjit Bagal
मी तर चोरांचा सरदार... : कृषिमंत्र्यांचे अजब विधान!

दरम्यान, नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदे चांगलेच रमले होते. त्यांच्या प्रमाणे इतर नेत्यांनीही एकमेकांच्या घरी भेटीगाठीची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र बघायला मिळत होते. यामध्ये त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मी जेव्हाही टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री टीव्हीवरतीच दिसतात. राज्यातील जनतेच काम करण्यासाठी राज्याला दोन मुख्यमंत्री हवे, अशी टीका देखील त्यांनी केली होती. आता स्विभिमानीकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यपद्धतीचे खिल्ली उजडवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com