राहुरीत माजी नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांवर संकट

राहुरी नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून तनपुरे कुटुंबाचे वर्चस्व आहे.
राहुरीत माजी नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांवर संकट
Rahuri Municipal CouncilSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील 10 स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रभाग निहाय आरक्षण काल (ता. 13) जाहीर झाले. यात राहुरी नगरपालिकेचा समावेश आहे. या नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून तनपुरे कुटुंबाचे वर्चस्व आहे. यातच प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्याकडे राज्यातील नगर विकास विभागाचे राज्यमंत्री पद आहे. त्यामुळे ही सत्ता राखणे हे मंत्री तनपुरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. नवीन प्रभाग आरक्षणामुळे माजी नगराध्यक्षसह आठ नगरसेवकांना नवीन प्रभागात उमेदवारी करावी लागण्याचे राजकीय संकट आले आहे. ( Crisis on eight councilors including former mayor in Rahuri due to ward reservation )

राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी राहुरी नगरपालिकेच्या सभागृहात काल ( ता. 13 ) प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. ही प्रशासकीय प्रक्रिया पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. राहुरी नगरपालिकेत 12 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक या प्रमाणे 24 नगरसेवक असणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत पहायला मिळणार आहे.

Rahuri Municipal Council
राहुरी कृषी विद्यापीठाचे बियाणे उगवेना : 12 शेतकऱ्यांना द्यावी लागणार नुकसान भरपाई

आधीच प्रभाग वाढल्याने पूर्वीची प्रभाग रचना काहीशी बदलली आहे. यातच माजी नगराध्यक्षा अनिता पोपळघट, संगिता आहेर, दिलीप चौधरी, सोनाली बर्डे, मुक्ता कर्पे, सूर्यकांत भुजाडी, नमिता शेटे, सोन्याबापू जगधने आदींना उमेदवारीसाठी नवीन प्रभाग शोधावे लागणार आहेत. त्यामुळे राहुरी शहरातील राजकीय नेत्यांची गणिते बिघडली आहेत. त्यामुळे नवीन उमेदवारांना यंदा संधी मिळण्याची चिन्हे आहेत. अनुसूचित जातीसाठी चार, अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव आहेत. यात 50 टक्के महिलांना संधी देण्यात आली आहे.

Rahuri Municipal Council
राहुरी तालुक्यात मंत्री प्राजक्त तनपुरे गटाचाच बोलबाला

हर्ष तनपुरे करणार उमेदवारी

या आरक्षणामुळे राहुरीत मोठी राजकीय उलथा पालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या तथा माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांच्या जागी यंदा युवा नेते हर्ष अरूण तनपुरे निवडणूक रिंगणात दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे भावी नगराध्यक्ष म्हणून पाहिले जात आहे. याच नगरपालिकेवर मंत्री प्राजक्त तनपुरे हे काही काळ नगराध्यक्ष होते.

प्रभाग निहाय आरक्षण

प्रभाग 1 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 2 : अ) अनुसूचित जाती, ब) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 3 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 4 : अ) अनुसूचित जाती, ब) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 5 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 6 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 7 : अ) अनुसूचित जाती (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 8 : अ) अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 9 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 10 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 11 : अ) अनुसूचित जमाती (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग 12 : अ) अनुसूचित जाती (महिला), ब) सर्वसाधारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in