केंद्राच्या धोरणामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट

मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी राज्यातील वीज भारनियमनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.
केंद्राच्या धोरणामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट
Prajakt TanpureSarkarnama

राहुरी (जि. अहमदनगर ) - खडांबे खुर्द (ता. राहुरी) येथे 5 कोटी 35 लाखांच्या वीज उपकेंद्र उभारणी कामाचा प्रारंभ राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी राज्यातील वीज भारनियमनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. ( Crisis of load shedding on the state due to the policy of the Center )

प्राजक्त तनपुरे म्हणाले, केंद्र सरकारचा विद्युत कंपन्यांच्या खासगीकरणाचा डाव आहे. वीज कंपन्यांची अडवणूक करण्याचे धोरण घेतले जात आहे. त्यामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट कोसळले आहे, अशी टीका माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली.

Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, विरोधकांच्या ईडीला विकास कामांतून उत्तरे देणार...

तनपुरे पुढे म्हणाले की, खडांबे गावाने दोन एकर जागा दिल्याने वीज उपकेंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला. विजेची वाढती मागणी, तुटवडा होत असल्याने नवीन वीजनिर्मिती शिवाय पर्याय नाही. या उपकेंद्रामुळे धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक या चार गावांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे या उपकेंद्रासाठी आग्रही होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, न्यायालयात योग्य तो न्याय मिळेल...

मागील पंधरा वर्षात महावितरणने एकही रोहित्र बसविले नाही. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवघ्या अडीच वर्षात मतदार संघात सहा नवीन वीज उपकेंद्रांचे काम हाती घेतले. 250 नवीन रोहित्र बसविले. मतदार संघात विद्युत विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 50 कोटींची विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे वीजेचे प्रश्न सुटणार आहेत. शेतकऱ्यांनी वीजबिल सवलत योजनेचा लाभ घ्यावा. वीजगळती कमी करुन, जाळे विस्तारुन पूर्ण दाबाने वीज देण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब जठार होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, शामराव खेतमाळस्कर, भागवत पागिरे, दिलीप जठार, किसन जवरे, उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड आदी उपस्थित होते.

Prajakt Tanpure
Video: न्यायालयात योग्य तो न्याय मिळेल हा विश्वास आहे ; प्राजक्त तनपुरे

सौर उर्जेशिवाय पर्याय नाही

आगामी पंधरा-वीस वर्षात कोळशाचा साठा संपणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय राहणार नाही. सौर ऊर्जेसाठी अनुदान योजना आहे. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचे पंप बसवावेत. पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, कीटकनाशके, औषधांच्या दरवाढीमुळे जनता हैराण आहे. केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे, असेही मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.