१० वर्षीय दिव्यांग मुलाच्या पार्थिवावर तब्बल २८ तासांनी अंत्यसंस्कार; BDO सक्तीच्या रजेवर

Solapur : प्रांताधिकारी हेमंत निकम, संजिवनी बारंगुळे यांनी बच्चू कडू यांच्याशी तीन वेळा दूरध्वनीवरुन संपर्क साधला...
Solapur Latest Crime News
Solapur Latest Crime NewsSarkarnama

बार्शी : चिखर्डे (ता.बार्शी) येथे ग्रामपंचायतकडून दिव्यांगाना देण्यात येणारा निधी मिळत नसल्याने १५ नोव्हेंबरपासून स्मशानभूमीमध्ये उपोषण सुरु असताना अल्पवयीन दिव्यांग मुलगा संभव (वय १०) याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बार्शी तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिले असून तीन सदस्यीय समितीद्वारे एक महिन्यात चौकशी पूर्ण करुन संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कुरुळे कुटुंबियांनी तब्बल 28 तासानंतर दिव्यांग मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. (Solapur Latest Crime News)

Solapur Latest Crime News
Udayanraje Bhosale : माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना मोठं होता येत नाही; उदयनराजेंचा इशारा कुणाकडे

उपोषण सुरु असताना दिव्यांग संभव रामचंद्र कुरुळे (वय १०) याचा रविवारी दुपारी चारच्या दरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा (Crime) दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही,अशी भूमिका मुलाचे वडील रामचंद्र कुरुळे व उपोषणकर्ते यांनी घेतली होती.

दरम्यान सोमवारी सकाळी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजिवनी बारंगुळे यांनी कुरुळे कुटुंबांच्या घरासमोर प्रशासन चर्चा करीत असतानाच पोलिसांसमोरच डिझेलची बाटली अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला पोलिसांनी त्यांना रोखले.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रविवारी दुपारी चारनंतर कुरुळे कुटुंबाच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनिल शेरखाने, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वैराग, पांगरी, बार्शी तालुका पोलीस (Police) ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Solapur Latest Crime News
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा फुशारकी : 'बेळगावात येण्याचे धाडस कराल तर... '

आमची मुलगी वैष्णवीचे तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्कालीन उपजिल्हाधिकारी जाधव यांनी पंधरा दिवसांत कार्यवाही करतो म्हणून लेखी आश्वासन दिले होते. त्यावेळी आम्ही अंत्यविधी केला होता. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आम्ही मुलगा संभववर अंत्यसंस्कार करणार नाहीत.

प्रशासन केवळ कागद देते अन् निघून जाते. आमचा प्रशासनावरील विश्वास संपलेला आहे. आम्हाला आता पैसे घेऊन काय करायचे, दोन्ही दिव्यांग मुले गेली आहेत. दिव्यांगांच्या व्यथा आम्ही मांडत असून यापुढे दिव्यांगांना प्रशासनाकडून त्रास होऊ नये, असा हेतू यामागे आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे यावे अन्यथा आम्ही मृतदेह घेऊन सोलापूरला जातो, असे मृत दिव्यांगाचे वडिल रामचंद्र कुरुळे यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, प्रांताधिकारी हेमंत निकम, संजिवनी बारंगुळे यांनी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचेशी तीन वेळा दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करुन समितीचा निर्णय होताच गुन्हे दाखल करावेत, असे सांगितल्याचे स्पष्ट केले.

रविवारी दुपारी चारपासून कुटुंबाने संभवचा मृतदेह चिखर्डे येथे घरी आणून ठेवला होता प्रशासन अंत्यसंस्कारासाठी सोमवारी पहाटेपासून प्रयत्नशील होते पण सोमवारी सायंकाळी चार वाजता कुरुळे कुटुंबाने लेखी आश्वासन स्विकारले मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला त्यानंतर रात्री आठ वाजता म्हणजे तब्बल २८ तासानंतर अंत्यसंस्कार झाले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सीईओ दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुनील शेरखाने यांनी मृत दिव्यांग संभवचे वडिल रामचंद्र कुरुळे, संजिवनी बारंगुळे यांना गटविकास अधिकारी माणिक बिचकुले यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असून तीन सदस्यीय समितीद्वारे एक महिन्यात चौकशी पूर्ण करुन संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करु व चौकशी समितीच्या बैठकीला बोलवू असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे.

मुलगी वैष्णवीला मदत मिळालीच नाही, मुलगा संभवला मिळावी यासाठी ग्रामपंचायत अपंग निधी मुख्यमंत्री सहायता निधी, राजीव गांधी सहायता निधीमधून आर्थिक मदत मिळावी म्हणून दिवाळीवेळी उपोषण सुरु केले होते पण प्रशासनाने मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतसमोर उपोषण करण्यास परवानगी दिली नाही म्हणून १५ नोव्हेंबर पासून चिखर्डे स्मशानभूमीत अमर पाटील, नंदकुमार गिरमकर, रामचंद्र कुरुळे, संभव कुरुळे यांचेसह उपोषण सुरु केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com