सातारा : मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलासा देत अखेर जामीन मंजूर केला. मागीलवेळी श्री. गोरे हे जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे शरण आले होते. त्यावेळी सुनावणी होऊन त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाला होता.
मायणी येथील मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती.
त्यानंतर वडुज येथील सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर आमदार गोरेंच्यावतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना आमदार गारेंना अटकेपासून संरक्षण दिले होते. पण तेथेही जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आमदार गोरेंना अटकेपासून दिलासा देत त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात शरण येत तेथेच जामीन घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आमदार जयकुमार गोरे हे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयापुढे आज शरण आले. तसेच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे जिल्हा न्यायालय त्यांच्या अर्जावर काय निर्णय देणार याची उत्सुकता होती. पण, न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. आज पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात पुढील सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने आमदार गोरेंना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.