विधान परिषदेची धामधूम संपताच कोल्हापूरचे पुढारी पुन्हा एकमेकांना भिडणार

कोरोनाचा कहर पाहता या निवडणुकांना वेळोवेळी स्थगिती देण्यात आली होती.
विधान परिषदेची धामधूम संपताच कोल्हापूरचे पुढारी पुन्हा एकमेकांना भिडणार
Kolhapur District Banksarkarnama

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (District Bank Election) ज्या टप्प्यावर थांबली आहे. तेथून पुढे ती सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश आज (ता. २५ नोव्हेंबर) उच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल झालेल्या स्वतंत्र याचिकेवरील निर्णय देताना दिला.

Kolhapur District Bank
राजकारण तापले; पाटील अन् महाडिक गट आमने-सामने

सध्या जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Election) सुरू आहेत. त्यातच आता जिल्हा बँकेची प्रक्रिया सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत मे २०२० मध्येच संपली आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा कहर पाहता या निवडणुकांना वेळोवेळी स्थगिती देण्यात आली होती. ऑगस्टमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली. त्यानंतर बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली.

त्याच दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी विभागीय सहनिबंधक अरूण काकडे यांची नियुक्तीही झाली. निवडणुकीचा कार्यक्रमही प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. मात्र, त्याच दरम्यान काही संस्थांनी मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Kolhapur District Bank
`सतेज पाटील शपथेवर खोटे बोललेत! संपत्ती लपवली, घरपट्टी थकवली..`

या संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय प्रलंबित होता. तत्पुर्वीच मडिलगे (ता. आजरा) येथील शंकरसिंग विकास सोसायटीच्यावतीने ही निवडणूक तातडीने घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर आज न्यायमुर्ती जामदार व न्यायमुर्ती पटेल यांच्या खंडपीठासमोर झाली. या खंडपीठाने जिल्हा बँकेची निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली आहे, तेथून ती पुढे सुरू करण्याचे आदेश दिले. सद्या जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Related Stories

No stories found.