सुवेंद्र गांधी व कुटुंबियांना न्यायालयाचे समन्स

नगर अर्बन बँकेतील ( Nagar Urban Bank ) व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने बंधने आणली आहेत.
सुवेंद्र गांधी व कुटुंबियांना न्यायालयाचे समन्स
Nagar urban bankSarkarnama

अहमदनगर - नगर अर्बन बँकेतील ( Nagar Urban Bank ) व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने बंधने आणली आहेत. अशातच जिल्हा न्यायालयाने बँकेचे विद्यमान संचालक सुवेंद्र गांधी यांच्यासह त्यांचे बंधू देवेंद्र आणि काकू संगीता अनिल गांधी अशा तिघांना समन्स बजाविण्यात आले आहे. ( Court notice to Suvendra Gandhi and his family )

अर्बन बँक गैरव्यवहारप्रकरणी 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यात सुवेंद्र, देवेंद्र आणि संगीता गांधी यांची नावे नव्हती. तत्पूर्वी लेखा परीक्षक चंद्रकांत पवार यांनी केलेल्या परीक्षणात, वरील तिघांनी अर्बन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील मे. मनसुख मिल्क प्रॉडक्टस या खात्यात पैसे नसताना मोठ्या रकमेचे धनादेश वटवून घेतले, असे दिसून आले.

Nagar urban bank
नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

बँकेच्या सस्पेन्स खात्याचा गैरवापर करून सभासदांची फसवूणक केली, याबाबत त्यांना रिझर्व्ह बँकेने पाच लाखांचा दंड केला. मात्र, तो दंड वरील तिघांनी न भरता तो बँकेच्या खात्यातून भरला. त्यासाठी 15 धनादेश वापरले असून, ते कोटक बँकेच्या नावाचे आहेत. लेखापरीक्षकाच्या साक्षीमध्ये त्यांची नावे दिसून आली आहेत. त्यामुळे वरील तिघांना कलम 319 प्रमाणे आरोपी करावे, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यावर न्यायालयाने वरील तिघांना समन्स बजावले.

Nagar urban bank
नगर अर्बन बॅंकेच्या दीडशे कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

नगर अर्बन बँकेवरील निर्बंध हटविण्यात यावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बँकेच्या विद्यमान संचालकांना सांगितले होते. मात्र बँकेवरील निर्बंध दूर होणे तर सोडाच उलट विद्यमान संचालक मंडळाचे नेते सुवेंद्र गांधी यांना नोटीस आल्याने संचालक मंडळ व ठेवीदारांत चिंतेचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.