नीलेश लंके प्रतिष्ठानचा पलटवार : कोरोना सेंटरसाठी सरकारचे अनुदान घेतले नाही

या कामांसाठी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी पाठपुरवा केला.
Nilesh Lanke & Sujit Zaware
Nilesh Lanke & Sujit ZawareSarkarnama

Nilesh Lanke Vs sujit Zaware : पानेर तालुक्यातील विविध गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या योजनांचा सन २०२१ मध्येच आराखडयात समावेश करण्यात आला असून महाविकास अघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच या योजनांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असल्याचे बहुतांश लाभार्थी गावांच्या सरपंचांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान या कामांसाठी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी पाठपुरवा केला, या कामांचे श्रेय केवळ आमदार लंके यांनाच आहे. भाजपाचे खासदार सुजय विखे अथवा तालुक्यातील भाजपा पुढा-यांचा त्याच्याशी काहीही सबंध नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. १६६ कोटींच्या कामांना प्रशासकिय मंजुरी मिळालेली आहे तर १३४ कोटींच्या योजना प्रस्तावित आहेत.

Nilesh Lanke & Sujit Zaware
Nilesh Lanke : कार्यकर्ता हीच माझी ताकद...

यासंदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पारनेर तालुक्यातील ९३ गावांचा आराखडयात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

टाकळीढोकेश्‍वरच्या सरपंच अरूणा खिलारी, मांडवेखुर्दचे सरपंच सोमनाथ आहेर,पिंपरी पठाराचे उपसरपंच अनिल शिंदे,तिखोलच्या रोहिणी ठाणगे, म्हसोबा झाप प्रकाश गाजरे, पळसपुर सुवर्णा आहेर, काताळवेेढे पियुष गाजरे, सावरगांव वैशाली चिकणे, नांदूरपठार चित्रा घोलप,कारेगाव सरपंच बापू ठुबे यांच्यासह योजना मंजुर असलेल्या सर्व गावांचे सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी या योजनेचे श्रेय केवळ आ. नीलेश लंके यांनाच असल्याचे ठामपणे सांगितले.

Nilesh Lanke & Sujit Zaware
Nilesh Rane : रत्नागिरीत राडा : माफी मागून राणेंनी केली कशीबशी आपली सुटका

१०० नव्हे, १६६ कोटी

जल जीवन मिशन योजनेची १०० कोटी रूपयांची कामे खा. सुजय विखे यांनी मंजुर केल्याचे तालुक्यातील भाजपा पुढारी सांगत आहेत. प्रत्यक्षात या कामांसाठी १६५ कोटी ८२ लाख ७४ हजार ७३२ रूपयांचा निधी मंजुर झाला असल्याचा दावा लंके समर्थक सरपंचांनी केला आहे.

१३४ कोटींची प्रस्तावित कामे

मंजुर गावांव्यतीरिक्त तालुक्यातील भोयरे गांगर्डा, देसवडे, देवीभोयरे, धोत्रे बु, धोत्रे खुर्द, हिवरे कोरडा, पाडळीकान्हूर, माळकूप, गोरेगाव, लोणीमावळा, रूईछत्रपती, वाळवणे, रायतळे, पिंपरीगवळी, सावरगांव, वडझिरे, शेरीकोलदरा, वासुंंदे,राळेगणसिध्दी, शिरापूर, माजमपूर, हकीगतपुर, बाभुळवाडे, खडकवाडी, तास, वनकुटे, निघोज, मोरवाडी, ढवनवाडी, शिरसुले, वडगांव गुंड, जवळा, काताळवेढे, डोंगरवाडी, पळवे बु. पळवे खु. या गावांमध्येही पाणी योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी १३३ कोटी ६७ लाख ५२ हजार खर्च अपेक्षित असल्याचे यावेळी कागदपत्रांच्या पुराव्यासह सांगण्यात आले. या कामांनाही लवकरच मंजुरी मिळेल असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आता साक्षत्कार कसा

खडकवाडी ते वासुंदे रस्ता बजेटमध्ये १ मार्च २०२१ रोजी मंजुर झालेला आहे. असे असतानाही तालुक्यातील भाजपाचे पुढारी हा रस्ता विद्यामान पालकमंत्र्यांनी मंजुर केल्याचा दावा करीत असल्याचे सांगत लंके समर्थक सरपंचांनी मंजुरीची आदेशच माध्यमांपुढे सादर केला.

कोरोना सेंटरमुळे आमदार नीलेश लंके यांचे नाव जगभरात झाले आहे त्याचीच पोटदुखी विरोधकांना आहे. कोरोना सेंटरला कीती निधी मिळाला, मोहटादेवी दर्शनासाठी कोणी खर्च केला याची विचारणा करणाऱ्यांनी कोरोना काळात किती रूग्णांना मदत केली याचे जनतेला उत्तर द्यावे, रेमडीसिविर इंजेक्शनसाठी किती पैसे उकळले हे तालुक्याला माहीती आहे. आपण आपल्या परीवाराला कधी देवदर्शनाला नेले का ? गोरगरीब जनतेला देवदर्शन होत असताना तुमची पोटदुखी का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजेश्‍वरी कोठावळे, तालुकाध्यक्ष पुनम मुंगसे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे यांनी केला आहे.

कार्यकर्ते, दानशुरांच्या मदतीतून

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी आम्ही कोणतेही अनुदान मिळावे यासाठी कोणताही प्रस्ताव शासन दरबारी पाठविलेला नाही. व कोणतेही अनुदान सुध्दा मिळालेलेे नाही. टिका टिपन्नी करणारांनी अभ्यासपुर्ण माहीती घेऊनच टिका करावी अथवा कोव्हीड रूग्णांची माफी मागावी. गावोगावचे सहकारी, दानशुर व्यक्ती तसेच देश परदेशातून आलेल्या मदतीतून हे सेंटर चालविण्यात आले.

- सुदाम पवार, अध्यक्ष, नीलेश लंके प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य

प्रतिष्ठाणचे सहकारी, दानशुर व्यक्ती यांच्या मदतीतून देवदर्शन

मोहटादेवी दर्शन यात्रा नीलेश लंके प्रतिष्ठाणचे गावागावातील सहकारी तसेच दानशुर व्यक्तींच्या मदतीतून सन २०१६ पासून राबविण्यात येते. त्यामुळे आमचा दुसऱ्यांच्या पाकीटांवर डोळा नसतो. पाकीटमारांनी हे ध्यानात घ्यावे, असे सुदाम पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com