सुजय विखेंना कोरोनाची लागण

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilParesh Kapse

अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरून दिली. Dr. Sujay Vikhe Patil News Update

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सहा महिन्यांपूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घेतली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी विलगीकरणात राहणे पसंत केले आहे.

Dr. Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. सुजय विखे ही कोरोना पॉझिटिव्ह

या बाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर देताना म्हंटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी म्हंटले आहे.

Dr. Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी भाजप नेत्याचे विठ्ठलाला साकडे

खासदार विखे पाटील लवकर बरे व्हावेत असे संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 304 जण कोरोनाचे उपचार घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in