स्वत: कोरोना बाधित मात्र चिंता मतदार संघातील मुलांच्या लसीकरणाची

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आपले काम दुरध्वनीच्या व आधुनिक जनसंपर्क साधनांच्या माध्यमातून सुरूच ठेवले आहे.
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चार मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात विखे पिता-पुत्रांचाही समावेश आहे. ते विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असतानाही भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आपले काम दुरध्वनीच्या व आधुनिक जनसंपर्क साधनांच्या माध्यमातून सुरूच ठेवले आहे. Corona herself infected but concerned about vaccination of children in the constituency

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोविड टेस्‍ट पॉझिटिव्‍ह आल्‍याने ते सध्‍या विलगीकरणात आहेत. त्‍यांनी सोमवारपासून सुरु झालेल्‍या या लसीकरण मोहिमेचा आढावा दूरध्‍वनीवरुन शासकीय आधिकारी आणि आरोग्‍य आधिकारी यांच्‍याकडून घेतला. शिर्डी विधानसभा मतदार संघात 15 ते 18 या वयोगटातील मुलांची असणारी संख्‍या, उपलब्‍ध होणारी लसींची मात्रा आणि यासाठी आवश्‍यक असलेल्‍या लसीकरण केंद्राच्‍या नियोजनाबाबत केलेल्‍या तयारीची माहिती त्‍यांनी शासकीय यंत्रणेकडून जाणून घेतली.

<div class="paragraphs"><p>Radhakrishna Vikhe Patil</p></div>
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यानेही इंधनावरील शुल्क कपात करावी...

आमदार विखे पाटील यांनी सांगितले की, ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्‍या नव्‍या संक्रमणाच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्‍याच्‍या घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयाचे स्‍वागत करुन, नागरिकांनी आपल्‍या पाल्‍यांचे लसीकरण करुन घेण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

<div class="paragraphs"><p>Radhakrishna Vikhe Patil</p></div>
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकलायं...

त्यांनी पुढे म्हटले आहे की, देशात कोविड संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम सुरु केली. यामध्‍ये देशात दीडशे कोटींचा ऐतिहासिक टप्‍पा आता पूर्ण होत आहे. कोविड संकटाच्‍या नव्‍या विषाणू नंतर देशातील 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्‍यासही केंद्र सरकारने परवानगी देवून त्‍याची अंमलबजावणी प्राधान्‍याने सुरू केली आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण करुन घेण्‍यासाठी पालक, संस्‍थाचालक तसेच शहर आणि गावपातळीवरील भाजपच्‍या सर्व स्‍थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी पुढाकार घेवून मुलांचे लसीकरण करुन घेण्‍याबाबत प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन आमदार विखे पाटील यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com