विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये वाद पेटला : पर्याय खुला असल्याचा इशारा

नायकवडी यांनी विरोधी पक्षनेते पद मागितल्याने काँग्रेस नेत्यांसमोर नव्याने पेच उभारणार आहे.
विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये वाद पेटला : पर्याय खुला असल्याचा इशारा
CongressSarkarnama

सांगली : सांगली महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेसमधील संघर्ष शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंगेश चव्हाण यांच्या पाठोपाठ मिरजेतील ज्येष्ठ नगरसेविका वहिदा नायकवडी यांनीही या पदावर दावा सांगितला आहे. त्यांनी अद्याप विरोधी पक्षनेता बदलाच्या पत्रावर स्वाक्षरीही केलेली नाही. (Controversy in Congress over Opposition Leader post at Sangli )

मिरजेतील ज्येष्ठ नगरसेविका वहिदा नायकवडी आणि त्यांचे पती अय्याज नायकवडी हे वसंतदादा गटाशी एकनिष्ठ आहेत. मिरज नगरपालिकेपासून ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून काम करताहेत. महापालिकेतही त्यांनी कॉंग्रेसच्या नगरसेविका म्हणून आक्रमक काम केले आहे. मात्र पदाच्या बाबतीत त्यांना लांब ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मिरजेचे संजय मेंढे यांना ज्येष्ठतेच्या निकषावर नेत्यांनी संमती दर्शवली आहे. उत्तम साखळकर यांनी गटनेता तथा विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वी दिला आहे. त्यामुळे उद्या सोमवारी काँग्रेसकडून गटनेता तथा विरोधी पक्षनेता म्हणून संजय मेंढे यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच मंगेश चव्हाण यांच्या पाठोपाठ वहिदा नायकवडी यांनीही या पदासाठी दावा केला आहे.

Congress
तौफिक शेख यांचा व्हिडिओ खासदार ओवेसींकडे

मिरजेचे काँग्रेस नेते अय्याज नायकवडी म्हणाले,‘‘नगरपालिकेपासून काँग्रेसचे निष्ठावंत आहोत. आजवर महापालिकेतील कोणतेही महत्त्वाचे पद आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे नेत्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या नगरसेविकेला विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली पाहिजे.’’ नायकवडी यांनी विरोधी पक्षनेते पद मागितल्याने काँग्रेस नेत्यांसमोर नव्याने पेच उभारणार आहे. सर्व नाराजांची समजूत काढून घेतलेला निर्णय कायम करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.

Congress
आमदार देशमुखांचे चिरंजीव कोठेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आजवरच्या कामाचा आणि ज्येष्ठत्वाचा विचार करून विरोधी पक्षनेते पदाची संधी द्यावी; अन्यथा आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत, असा इशाराच मिरजेतील काँग्रेस पक्षाचे नेते अय्याज नायकवडी यांनी नेतृत्वाला दिला आहे.

कोणत्याही नावाला विरोध अथवा समर्थनही नाही

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे, कार्याध्यक्ष लोंढे यांनीही प्रयत्न केले आहेत. मात्र आज त्यांनी, पक्षाचे नेते जो निर्णय घेतील, तो मान्य राहील. युवा मंचचा कोणत्याही नावाला विरोध अथवा समर्थनही नाही, असे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.