Bribe
Bribe sarkarnama

२० हजारांची लाच घेताना हवालदारास पकडले... लोणंद पोलिस ठाण्यातील घटना

गृहराज्यमंत्र्यांच्या Minister of State for Home Affairs जिल्ह्यात पोलिसांच्या police लाचखोरीच्या Bribe घटना वाढत असल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा : एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लोणंद पोलिस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले आहे. भगवान किसन पवार असे संबंधित हवालदाराचे नाव आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी : तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना पोलिस ठाणे येथे दाखल एका गुन्हात मदत करून त्या गुन्ह्यातुन बाहेर काढण्यासाठी तक्रारदाराकडे संबंधित हवालदाराने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवालदारास रंगेहात पकडले. भगवान किसन पवार असे संबंधित हवालदाराचे नाव आहे.

Bribe
गृहमंत्री वळसे पाटील आणि उदयनराजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक विक्रम पवार, पोलिस निरिक्षक सचिन राऊत तसेच संभाजी काटकर, निलेश वायदंडे, निलेश येवले आदींनी केली आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलिसांच्या लाचखोरीच्या घटना वाढत असल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com