राजकीय दबावातून माझ्या विरोधात षडयंत्र; ॲफेडेव्हिट, सही, अंगठाही बोगस...

लढाई सुरु The battle began झाली आहे. जयकुमार Jaykumar Gore या लढाईतून मागे हटणार नाही, Will not retreat from battle असेही त्यांनी सांगितले.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

सातारा : गेल्या महिनाभरापासून माझ्यावर गुन्हे दाखल करायचे षडयंत्र सुरु होते. कोणताच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून राजकीय दबावतंत्र वापरुन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या विरोधात आजपर्यंत अनेक षडयंत्र रचले गेले आहे. आता ही लढाई सुरु झाली आहे. जयकुमार या लढाईतून मागे हटणार नाही, असा इशारा भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना आमदार गोरे म्हणाले, ''माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदार कोण आहे हे मला माहित नाही. छत्रपती शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या जागेसंदर्भातील एनए प्रकरणी घेतलेल्या संमती पत्राचा विषय आहे. संबंधित व्यक्तीला त्यांची जमीन बळकावण्यात आली आहे, तुमच्या जमीनीवर बुलडोझर फिरवला जाणार आहे, अशी धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीला गुमराह करुन माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायला भाग पाडले आहे. त्यासाठी वापरलेले ॲफेडेव्हिट बोगस आहे. त्यावरील फक्त फोटो माझा आहे. माझी सही आणि अंगठा बोगस आहे.''

MLA Jaykumar Gore
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एका लोकप्रतिनिधीचे ॲफेडेव्हिट तो हजर नसताना तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. पोलिसांनी माझा आधारकार्डशी लिंक असणारा अंगठा आणि ॲफेडेव्हिटवरील बोगस अंगठा व्हेरिफाय करण्याची गरज आहे. माझ्यावर राजकीय दबाव वापरुन गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील काही महाभाग रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. आता सुरुवात झाली आहे. शेवट होईपर्यंत मी पण थांबणार नाही. किती एफआयआर दाखल होतील हे येणारा काळच ठरवेल. बोगस गुणपत्रिका, दाखले तयार करुन बोगस डॉक्टर्स तयार करण्याचा कारखाना मायणीत सुरु होता.

MLA Jaykumar Gore
रोहित पवार म्हणाले, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही...

एक वर्षभर त्या विरोधात गुन्हा दाखल होत नव्हता. त्यासाठी मोठी राजकीय ताकद पणाला लावण्यात आली होती. आम्ही प्रयत्न केल्याने तो गुन्हा दाखल होताच माझ्या विरोधात षडयंत्र रचले गेले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे बोगस डॉक्टर्स तयार करताना केलेला १२५ कोटींचा घोटाळा, बोगस कर्ज प्रकरणे, बोगस बॅंक गॅरंटी, ट्रस्टचे बोगस धनादेश असे गुन्हे दाखल होवू नयेत म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यासाठी असले उद्योग केले जात आहेत. लढाई सुरु झाली आहे. जयकुमार या लढाईतून मागे हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com