आम्ही स्टेट फॉरवर्ड माणसं; लपून डाव टाकणाऱ्यांना कोर्टाची चपराक : राजन पाटील

दूध पंढरीचा आखाडा : माजी आमदार राजन पाटलांना दिलासा; ४७ दूध संस्थांचा मतदानाचा हक्क कायम
Rajan Patil-Babanrao Shinde-Dilip Sopal
Rajan Patil-Babanrao Shinde-Dilip SopalSarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या (दूध पंढरी, Dudh Pandhari) निवडणुकीचे सर्व अधिकार आमदार बबनराव शिंदे (baban shinde) आणि माजी मंत्री दिलीप सोपल (dilip sopal) यांना दिले आहेत. मोहोळ तालुक्‍यासाठी आम्ही चार संचालकांची मागणी केली आहे. आम्हाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय आमदार शिंदे व माजी मंत्री सोपल घेतील, अशी माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. आम्ही स्टेट फॉरवर्ड माणसं आहोत. जे आमच्या ओटात आहे, तेच आमच्या पोटातही आहे. छुप्या पद्धतीने राजकारण करू पाहणाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निकालाने चपराक बसली असल्याचेही माजी आमदार पाटील यांनी सांगितले. (Dudh Pandhari election: Consolation to former MLA Rajan Patil; Right to vote of 47 dudh sangh maintained)

मोहोळ तालुक्‍यातील ४७ दूध संस्थांच्या मतदानाचा अधिकार आज उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. या निकालानंतर माजी आमदार पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्‍वास आहे. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. मोहोळ तालुक्‍यातील ४७ संस्थांच्या मतदानाचा हक्क कायम राहिल्याने दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सहकारात राजकारण आणू नये, (कै.) सुधाकरपंत परिचारक व (कै.) गणपराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी सहकारात जपलेली परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षाही माजी आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

Rajan Patil-Babanrao Shinde-Dilip Sopal
शिरूरमध्ये भाजपला धक्का : दादा पाटील फराटेंचा तालुकाध्यक्षपदाचा अखेर राजीनामा

उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती गौतम पटेल व माधव जामदार यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मोहोळ तालुक्यातील ४७ संस्था अवसायनात काढण्याचा अंतरिम आदेश झाला आहे. मात्र, अंतिम आदेश अद्यापही झालेला नाही, त्यामुळे मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा. कोरोना महामारीमुळे लेखापरीक्षणासह काही त्रुटी राहिल्या होत्या. सहकार कायद्यात २०२१ मध्ये झालेली दुरुस्ती, न्यायालयाचे यापूर्वीचे निवाडे ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. पुरुषोत्तम चव्हाण, ॲड. सुहास इनामदार यांनी न्यायालयासमोर सादर केले. दुग्ध उपनिबंधकांनी या ४७ संस्थांना मतदानाचा दिलेला अधिकार कायम ठेवावा, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने हा युक्तीवाद व विनंती मान्य करून मोहोळ तालुक्‍यातील ४७ संस्थांच्या मतदानाचा अधिकार कायम ठेवला आहे.

Rajan Patil-Babanrao Shinde-Dilip Sopal
महिला सदस्य आक्रमक; अध्यक्ष, सीईओ बाहेर गेल्याने घेतली अभिरूप सभा!

मानेंच्या अपिलावर आज फैसला

क्रियाशिल मतदार संघातून माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज अवैध ठरविला. या निर्णयाच्या विरोधात माजी आमदार माने यांनी दुग्ध उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्याकडे अपिल केले होते. हे अपिल फेटाळल्यानंतर माजी आमदार माने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी आमदार माने यांनी ॲड. अभिजित कुलकर्णी यांच्या माध्यमातून आज न्यायालयात याचिका दाखल करून उद्याच्या (मंगळवार) सुनावणीची तारीखही मिळविली आहे. माजी आमदार माने यांच्याकडे असलेल्या न्यायालयीन अनुभवामुळे व मुरब्बीपणामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्या (मंगळवार) सकाळी माजी आमदार माने यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दूध संघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या (मंगळवार) दुपारी तीनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उद्या न्यायालयात काय होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com