काँग्रेसच्या समीर मुनिर यांची ६ गोळ्या घालून हत्या : बारामती मतदासंघाची होती जबाबदारी

चंद्रभागा चौकात हि घटना घडली आहे.
Murder
Murder Sarkarnama

कात्रज : काँग्रेसचे पदाधिकारी समीर मुनिर (Sameer Munir) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील चंद्रभागा चौकात हि घटना घडली आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले असून मृतदेह मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, समीर मुनिर कात्रज परिसतातील चंद्रभागा चौकात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुपारी १२:३० च्या सुमारास तिघांनी दुचाकीवरून येत मुनिर यांच्यावर काही कळण्याच्या आत ६ गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये समीर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर कात्रज परिसरात तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी सध्या मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.

Murder
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

समीर मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पक्षाने नुकतीच त्यांना बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. सोबतच अलिकडेच आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com