सांगलीत धक्कादायक निकाल : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

विक्रम सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.
सांगलीत धक्कादायक निकाल : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांचा पराभव
vikram Sawant and Prakash JamdadeSarkarnama

सांगली : सांगली जिल्हा बँक निवडणूकीत धक्कादायक निकाल हाती यात आहेत. जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना ४५ मत मिळाली तर विक्रम सावंत यांना ४० मत मिळाली. विषेश म्हणजे सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.

vikram Sawant and Prakash Jamdade
सांगली जिल्हा बँकेत 'मविआ'ची विजयाकडे वाटचाल, भाजपला आतापर्यंत केवळ १ जागा

काल जिल्हा बँकेसाठी ८५.३१ टक्के इतके मतदान झाले. बँकेच्या संस्था व व्यक्तिगत अशा एकूण २५७३ पैकी २१९५ मतदारांनी हक्क बजावला आहे. बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे १८ जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान संचालकांसह ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज या बंद पेट्या उघडल्या जात असून यातून धक्कादायक निकाल हाती येत आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेलला आणि भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला किती जागा मिळणार? याचे गणित सध्या मांडले जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in