
Satara Congress News : काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी यांचा विजय असो, सोनिया गांधी यांचा विजय असो... अशी घोषणाबाजी करत काँग्रेस भवनासमोर फटाके फोडून व पेढे वाटप करून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कर्नाटकात झालेल्या काँग्रसेच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला.
कर्नाटकमध्ये काँग्रेसला Karnataka Congress सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल साताऱ्यात काँग्रेस Satara Congress कमिटीसमोर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी माजी कार्याध्यक्ष विजयराव कणसे, प्रदेश प्रतिनिधी रफीक बागवान, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अॅड. दत्तात्रय धनवडे, मनोजकुमार तपासे, अरबाज शेख, अन्वर पाशा खान, जगन्नाथ कुंभार, सुरेश कुंभार रणधीर गायकवाड, श्रीकांत कांबळे, सर्जेराव पाटील, सुषमा राजे घोरपडे, रजिया शेख, रणधीर गायकवाड, मालन परळकर, माधुरी जाधव, संभाजी उतेकर, विजय मोरे, सचिन पवार, सादिक खान, संतोष डांगे आदी.
सुषमाराजे घोरपडे म्हणाले, कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजय हा निकाल 'भारत जोडो' यात्रेचा सकारात्मक परिणाम आहे. या निवडणुकीमध्ये कर्नाटकमधील जनतेने भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी बजरंगबलीचे नाव वापरून धर्माच्या आडून मतांची भीक मागितली. कर्नाटकमधील जनतेने धर्माच्या नावाखाली केलेल्या प्रचाराला सडेतोड उत्तर दिले. हा विजय लोकशाहीचा विजय आहे.
या विजयाबाबत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई म्हणाले, कर्नाटकमध्ये सर्व सामान्य जनतेने काँग्रेसच्या मागे उभे राहून भाजपच्या हुकुमशाही प्रवृत्तीला नाकारले आहे. यापुढे देशाला काँग्रेस पक्षच प्रगतीपथावर नेऊ शकतो, असा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने त्यांनी काँग्रेसला हात दिला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच हे फलित आहे. काँग्रेसच्या विजयाचा मार्ग कर्नाटक राज्यातून आता पुढे जाईल आणि 2024 ला दिल्लीत काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास वाटतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.