गद्दारी करत पक्ष सोडला ; रणजितसिंह देशमुखांचा आमदार गोरे यांना टोला

'' गद्दारी करत काँग्रेस (Congress) पक्ष सोडला,'' असा टोला रणजितसिंह देशमुख (Ranjit Singh Deshmukh) यांनी नाव न घेता आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांना लगावला.
Ranjit Singh Deshmukh
Ranjit Singh Deshmukhsarkarnama

दहिवडी : ''रक्तात काँग्रेस आहे असे सांगणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल ३२ वेळा मतदारसंघात आणले. मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचा गैरफायदा स्वार्थासाठी घेतला. अन् एवढं करुन शेवटी गद्दारी करत काँग्रेस (Congress) पक्ष सोडला,'' असा टोला प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख (Ranjit Singh Deshmukh) यांनी नाव न घेता आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांना लगावला.

नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील कारंडे हॅाल येथे आयोजित काँग्रेसची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस प्रदेश काँग्रेस सचिव व निरीक्षक राजेंद्र शेलार, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. दत्तात्रय धनावडे, जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, महाराष्ट्र ओबीसी सेल चिटणीस धैर्यशील सुपले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, बाळासाहेब माने, विष्णुपंत अवघडे, महिला आघाडी अध्यक्ष नकुसा जाधव, युवक अध्यक्ष अॅड. संदीप सजगणे, उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, मुन्शी सय्यद, भिमराव काळेल, सदाशिव शिंदे, विश्वास जाधव, शिवाजी यादव, विकास गोंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Ranjit Singh Deshmukh
मोठी बातमी : चिदंबरम पिता-पुत्राला न्यायालयाकडून समन्स

रणजितसिंह देशमुख म्हणाले, ''मित्रपक्ष सुध्दा आपला फक्त वापर करतो. गरज संपली की आपल्याला चेपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत मित्रपक्ष असो वा अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ, वंचित बहुजन आघाडी असो. जे आपल्यासोबत येतील अन् जिथे सन्मान होईल त्यांच्यासोबत आघाडी करण्यात येईल. सर्व धर्मातील सर्व सामान्यांना सोबत घेवून जाणार काँग्रेस पक्ष आहे,''

ठाकरे सरकार पुरुन उरलं..भाजप दिशाहीन झालाय!

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी रविवारच्या 'सामना'तील 'रोखठोक'मधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. ''महाविकास आघाडी सरकार(Thackeray government) पाडणार,'' असं म्हणणाऱ्या भाजपनेत्यांवर राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले. विरोधी भाजपनं ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणातील कमरेखालचे वार करुनही सरकार कायम आहे,'' असं संजय राऊत (mp sanjay raut) यांनी म्हटलं आहे. त्यांनी ''दोन वर्षांचा काळ सरला! राज्य किती पुढं गेले'' अशा शीर्षकानं रोखठोक लिहिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com