नगरमध्ये काँग्रेसचा शिवसेना व राष्ट्रवादीला धक्का

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी राज्यात स्वबळाचा नारा देत पक्ष बांधणी सुरू केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अहमदनगर शहरातही काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे ( Kiran Kale ) यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरविले आहे.
Dashrath Shinde joins Congress
Dashrath Shinde joins CongressSarkarnama

अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा देत पक्ष बांधणी सुरू केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अहमदनगर शहरातही काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. दशरथ शिंदे हे सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तर नंतर शिवसेनेचे नेते होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाने अहमदनगर शहरात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. Congress pushes Shiv Sena and NCP in Ahmednagar

मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे दशरथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी किरण शिंदे, संतोष धनगर, विजय शिंदे, अंकुश धनगर, चंदर शिंदे, गोरख धनगर आदींसह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, काँग्रेस क्रीडा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

Dashrath Shinde joins Congress
किरण काळे यांचा आमदार जगतापांना टोला : म्हणाले, घाबरणे माझ्या रक्तात नाही

मागील आठवड्यात भाजप, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी या पक्षांतून काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यानंतर आता शिंदे यांच्यासारखा सावेडी उपनगरातील मोठा राजकीय मासा काँग्रेसने गळाला लावल्यामुळे काळे यांचे शहरातील राजकीय वजन वाढले आहे.

Dashrath Shinde joins Congress
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

दशरथ शिंदे हे राष्ट्रवादीकडून दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूषविले आहे. राष्ट्रवादीच्या भटके-विमुक्त आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष होते. त्यांनीनंतर दिवंगत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. राठोड यांच्या निधनानंतर ते शिवसेनेपासून काहीसे अलिप्त असल्याचे जाणवत होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सावेडीमध्ये काँग्रेसला शिंदे यांच्या रूपाने मजबूत नेतृत्व मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com