Solapur News : सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे खरंच 'कमळ' हाती घेणार?; की भाजपाची नुसतीच साखर पेरणी

Solapur LokSabha Constituency : 'विकासाचे कमळ' फुलवावे, अशी धारणा भाजपाच्या गोटात आहे.
Praniti Shinde : Sushilkumar Shinde
Praniti Shinde : Sushilkumar Shinde sarkarnama

Solapur News : सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे आत्तापासूनच जोरदारपणे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून येथे खुद्द पक्षातच पसंती आणि नापसंतीच्या मोठ्या वावड्या उठल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय वारसदार तसेच, विधानसभेला हॅट्रिक साधणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी खुद्द पक्षातूनच तीव्र विरोध होत आहे, दुसरीकडे, सुशीलकुमार शिंदे यांनीच या वेळेची लोकसभा लढवावी, यासाठी पक्षातूनच कार्यकर्त्यांचा दबाव वाढताना दिसत आहे.

अशातच येथील राजकारणाला वेगळे वलय, अस्तित्व असलेल्या विकासाभिमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या हाती 'कमळ' देऊन सोलापूर लोकभेच्या या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजपाकडून वेगळ्या राजकीय डावपेचाची शक्यता वर्तवली जात आहे. प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीला पक्षामधील होत असलेला विरोध लक्षात घेता, भाकरी फिरवून याच मुद्द्याच्या आधारे प्रणिती शिंदे यांना भाजपात घेण्याचा 'मास्टरस्ट्रोक'च्या हालचाली या पक्षात होत असल्याची चर्चा होत आहे.

विशेषकरून, वयाची ऐंशी गाठणाऱ्या सुशीलकुमारांनी सोलापूर लोकसभेची जागा स्वत: अडवून न ठेवता, ती तरुणाईसाठी मोकळी करून द्यावी. या जागेवर त्यांची राजकीय वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची उमेदवारी घेण्यास भाग पाडून येथे 'विकासाचे कमळ' फुलवावे, अशी धारणा आणि विचारप्रवाह भाजपाच्या गोटात आहे. तसे प्रयत्नही भाजपाच्या वर्तुळात सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजप प्रवेश होण्याच्या दृष्टीने त्यांचे मन वळवण्यासाठी तसेच मध्यस्ती करण्यासाठी कोणता 'वजनदार' चेहरा चालेल, याची चाचणी भाजपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चालू आहे. वास्तविक काँग्रेस हा आमचा 'श्वास' आणि 'ध्यास' आहे, आपण काँग्रेस पक्ष कधीच सोडणार नाही, आपला भाजप प्रवेश कधीच शक्य नाही. उलट या पक्षाकडूनच तशा वावड्या उठवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहे.

Praniti Shinde : Sushilkumar Shinde
Solapur Politics : मातोळीच्या गणपती दर्शनाने अभिजीत पाटलांच्या मंगळवेढ्यातील इनिंगची सुरुवात होणार का

आरक्षित सोलापूर लोकसभेसाठी भाजपाच्या विजयाची हॅट्रिक साधताना आमदार प्रणिती शिंदे यांच्या इतक्या सक्षम तुलनात्मक चेहरा, सर्वच आघाड्यांवर भाजप प्रवेशासाठी प्रणिती शिंदे यांच्यासाठीच प्रयत्न व्हावेत, अशी चर्चा स्थानिक नेतृत्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याकडे केल्याची शक्यता आहे.

सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाला खुद्द त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला हे गंभीर मानले जात आहे. त्याचाच फायदा प्रणिती शिंदे यांना भाजपात घेऊन सोलापूर लोकसभेची उमेदवारी त्यांना देता येईल, का याचेही आडाखे भाजपात बांधले जात आहेत. सध्या जरी अशा शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्या तरी राजकारणात कधीही काही होऊ शकते, या शक्यतेबाबत चर्चेचे वादळ घोंगावत आहे.

सुशीलकुमारांची 'ती' वक्तव्य अन् प्रणितींतच्या प्रवेशाची चाचपणी :

धर्मनिरपेक्षते संदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी भगव्या दहशतवादावर भाष्य केले आहे, त्यांचे हे भाष्य आमदार प्रणिती शिंदे यांच्या जर भाजपा प्रवेशाचा विचार होऊ लागला तर ते अडचणीचे ठरू शकते. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुशीलकुमार शिंदे यांची भगव्या दहशतवादाची वक्तव्य पटलेली नव्हती, त्यांच्या या वक्तव्यांना संघाच्या कार्यकर्त्यांचा याला जोरदार आक्षेप राहिला. खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील आपल्या पित्याच्या भगव्या दहशतवादाचे समर्थन केले आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपा प्रवेशाची वाट अत्यंत खडतर आहे, अशी ही चर्चा भाजपाच्या गोटात आहेत.

Praniti Shinde : Sushilkumar Shinde
Congress News : सोलापुरात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे पुन्हा मैदानात उतरणार का?

सुशीलकुमार शिंदे यांची ती वक्तव्य जुनी पुराणातली वांगी असे समजून, प्रणिती शिंदे यांच्या रूपाने सगळ्यात सक्षम नेतृत्व भाजपाला सोलापुरात मिळू शकते, असा सकारात्मक विचार झाल्यास प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या वाटेतील काटे दूर होऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com