मला सत्तेचे काही घेणे देणे नाही; उजनीच्या पाण्याला हात लावाल तर रान पेटवणारच!

उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी इंदापूरला देण्यावरुन सध्या संघर्ष सुरु आहे
 MLA Praniti Shinde
MLA Praniti Shindesarkarnama

सोलापूर : सोलापूरचे (Solapur) पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू, असा इशारा काँग्रेसच्या (Congress) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही, मी लहानपणापासून सत्ता पाहिली असल्याचेही शिंदे म्हणाल्या. उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी इंदापूर आणि बारामतीला (Baramati) देण्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शिंदे म्हणाल्या, उजनीचे पाणी 20 वर्षापूर्वी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले. आता उजनी प्लसमध्ये असूनही महापालिकेकडून याचे नियोजन होत नाही. महापालिकेमध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होते. तेव्हा तर उजनी धरण मायनसमध्ये होते तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला होता, असेही शिंदे यांनी सांगितले.

 MLA Praniti Shinde
पटोले म्हणतात, 'हे' प्रश्न सुटणार असतील तर कॉंग्रेस तुमच्यासोबत...

त्याच बरोबर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटी रुपये खर्च करुन एका रात्रीत पाणी आणले. राज्यात दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो का, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

 MLA Praniti Shinde
सुप्रिम कोर्टाचे आजकालचे निकाल समजण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज : सचिन सावंत

मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिली आहे. सोलापूरकरांचे पाणी जर दुसरीकडे वळवले तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हांला रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू नका, अशी भूमिका आमदार शिंदे घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com