Praniti Shinde : राहुल गांधींना सर्वसामान्य माणूस जसा मिठी मारू शकतो, तशी मोदींना मारण्याची हिंमत होईल का?

Solapur Congress News : केंद्र सरकार हे गोरगरिबांचे सरकार नाही. महिलांचे तर नाहीच नाही...
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

Praniti Shinde On PM Narendra Modi : राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते. वयस्कर महिला तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिंमत होईल का?  लगेच त्याच्याबद्दल बोलले जाते खरंतर हाच फरक आहे काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस होता त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

Praniti Shinde
Pimpri News : राष्ट्रवादीचे आमदार बनसोडेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चेत

शिंदे म्हणाल्या, माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात. त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात. त्यांच्या जवळ जातात. त्या महिला यांच्याकडे भाऊ म्हणून बघतात. आमचे नेते राजीव गांधी यांचा जीव त्यामुळे गेला. कारण एक महिला आली तिने राजीव गांधी यांना भावा सामान मिठी मारली.

Praniti Shinde
Chinchwad By- Election : पंकजा मुंडेंनतर चिंचवडच्या पीचवर श्रीकांत भारतीयांची फिल्डींग

केंद्र सरकार हे गोरगरिबांचे सरकार नाहीये. महिलांचे तर नाहीच नाही. महिलांकडे तुच्छ नजरेने बघते. महिलांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. त्यांना न्याय मिळवून देणारे तर दूरच अशी टीका करतानाच इंदिरा गांधी, सोनिया गांधींची काँग्रेस सदैव तुमच्यासोबत असल्याचा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in