Sangli News : जयंत पाटील पुन्हा देणार काँग्रेसला धक्का : माजी सभापतींसह अनेक नेते बांधणार हातात घड्याळ!

जयंतरावांच्या विस्तारवादी धोरणाचा अनेक वेळा काँग्रेसलाचा फटका बसलेला आहे.
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama

मिरज (जि. सांगली) : सांगलीच्या (Sangli) राजकारणात नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘करेक्ट कार्यक्रमा’साठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मिरजेत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मिरजेतील माजी पंचायत समिती सभापतींसह विविध नेते हाती घड्याळ बांधणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळर यांनी ही माहिती दिली. ( Congress leaders from Miraj will join NCP)

मिरज विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच तसेच मिरज पंचायत समितीचे माजी सभापती, माजी सरपंच, सोसायटी अध्यक्ष आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा बेडग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.

Congress-NCP
Solapur politics : ...तर बाबा मिस्त्री ठरले असते सोलापुरातील रवींद्र धंगेकर!

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी करताना जयंत पाटील यांनी अनेकदा भाजप आणि काँग्रेसमधील मातब्बरांना राष्ट्रवादीच्या गळाला लावले आहे. त्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेकदा कलगीतुराही रंगला आहे. मात्र, जयंतरावांच्या विस्तारवादी धोरणाचा अनेक वेळा काँग्रेसलाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय चालीकडे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बारीक लक्ष असते.

बेडग येथील मिरज-बेडग रोडवरील बुरसे बंगला नजिक शनिवारी (ता. ११ मार्च) भव्य पक्ष प्रवेश होणार आहे. काॅंग्रेस पक्षाचे पंचायत समिती माजी सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पत्रकार बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे उपस्थित होते.

Congress-NCP
Maharashtra Budget : धनगर समाजासाठी १००० कोटींची तरतूद : नगरमध्ये शेळी-मेंढी सहकार विकास महामंडळाचे मुख्यालय

मनोज शिंदे-म्हैसाळकर म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाची सर्व समावेशक धोरणानुसार वाटचाल सुरू आहे. त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन माजी सभापतींसह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Congress-NCP
Maharashtra Budget Session : फडणवीसांची शिवप्रेमींना मोठी भेट; शिवनेरीवर उभारणार शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय

या वेळी अविनाश पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष ॲड बाबासाहेब मुळीक, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाळासाहेब ओमासे, माजी सभापती दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे, रंगराव पाटील, कलगोंडा पडसलगे, वसंतराव गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com