एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम'च; काँग्रेस विरोधी प्रचारासाठी भाजपचा ओवैसी फॉर्म्युला

निवडणूका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी बाहेर पडतात आणि काँग्रस विरोधात विषारी प्रचार करून भाजपला फायद्या मिळवून देतात, असेही श्री. पठाण यांनी स्पष्ट केले.
zhakir Pathan
zhakir Pathanfacebook

कऱ्हाड : आठ वर्षापासून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे. त्याच्या पाया एमआयएम पक्षाने घातला आहे. त्यामुळे एमआयएम मुस्लिमांसाठी यम आहे, अशी टीका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण यांनी केली आहे.

निवडणूका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी बाहेर पडतात आणि काँग्रस विरोधात विषारी प्रचार करून भाजपला फायद्या मिळवून देतात, असेही श्री. पठाण यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने काय दिले व पुरोगामी विचारांची काँग्रेस नाही असा अपप्रचार करणारे ओवैसी यांच्या बापजाद्यांनी काँग्रेसबरोबर सत्ता का भोगली आहे, त्याचे उत्तर द्यावे.

zhakir Pathan
अमेरिकेच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर नरेंद्र मोदींनी केले 'हे' पहिले काम

तुम्ही 2013 पर्यंत याच काँग्रेससोबत सत्ता का भोगली, याचाही खुलासा करावा. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपच्या इशाऱ्यावर नाचत मुस्लिमांच्या खऱ्या शत्रुंच्या विरोधात न लढता त्यांच्या पायात लोटांगण घालणाऱ्या असदुद्दीन ओवैसींची नीती आता पश्चिम बंगालच्या मुस्लिमांनी देशातील मुस्लिमांसमोर उघड केली आहे. त्यामुळे ओवैसींची कूटनिती मुस्लिम समाजाने ओळखली आहे. त्यामुळे एमआयएमच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला मुस्लिम समाज बळी पडणार नाही.

zhakir Pathan
भाजप नेत्यांची खासदार अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली!;पाहा व्हिडिओ

मुस्लिम समाज हा भावनिक आहे भोळा आहे त्याच्या भावनेशी खेळ करण्याचा थांबवा, नाहीतर मुस्लिम समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाजाला भावनिक करून दिशाभूल करणाऱ्या ओवैसी यांनी जाणीव ठेवावी की काँग्रेसच्या राजवटीत लाखोच्या संख्येने महिला रस्त्यावर आंदोलनाला कधी उतरल्या नाहीत. एनआरसीसाठी महिलांना शाहीन बाग आंदोलन करावं लागलं नाही.

मुस्लिम बांधवांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे. पाच टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरलं ते मुस्लिम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण काँग्रेसनेच आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे बॅरिस्टर जीना 'पार्ट टू' आहेत, हे आता मुस्लिम समाजाने ओळखायला सुरुवात केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com