पोटनिवडणुकीचा निकाल लागताच सतेज पाटील 'ड्रीम प्रोजेक्ट'साठी धावले!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली.
Satej Patil
Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला (BJP) धूळ चारली. आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा जवळपास 19 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयासाठी जीवाचं रान केलं. या विजयानंतर ते दुसऱ्याच दिवशी आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी धावून गेले.

सतेज पाटील (Satej Patil) यांनी शनिवारी सकाळी आठ वाजता काळम्मावाडी धरण गाठलं. याठिकाणी पाईपलाईन प्रकल्पाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून त्यांनी कामाचा आढावा घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे आदी उपस्थित होते. कोल्हापूर (Kolhapur) शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पाटील यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

Satej Patil
जर त्यांना समजलं नाही तर तयारीत रहा! राज ठाकरेंनी दिला गंभीर इशारा

कोरोना काळामध्ये दोन वर्षे या प्रकल्पाच्या कामामध्ये व्यत्यय आला होता. पण त्यानंतर पाटील यांनी योजनेच्या कामाकडे नियमितपणे लक्ष देत हे काम लवकर पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. या प्रकल्पाच्या कामाचे अपडेट ते दररोज घेतात. पोटनिवडणुकीमध्येही थेट पाईपलाईनचा हा मुद्दा चर्चेत आला होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात 887 दिवस या कामासाठीच्या सर्व परवानग्या थांबून ठेवल्याने योजना रखडल्याचे सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील जाहीर सभेत सांगितले होते.

सतेज पाटलांनी मैदान मारलं

कोल्हापूर उत्तरची निवडणूक सतेज पाटील यांच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यामुळे सतेज पाटील विरूध्द चंद्रकांत पाटील अशीच ही निवडणूक होती. त्यामध्ये सतेज पाटील यांनी मैदान मारलं. या विजयानंतर बोलताना त्यांनी भाजप व चंद्रकांतदादांवर निशाणा साधला. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा श्वास थांबविण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केले आहे. पोटनिवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर भाजपने केला. पण, जनतेने त्यांना भीक घातली नाही. किंबहुना कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमानी बाणा दाखवत चंद्रकांतदादांना पुन्हा पुण्याला पाठविण्याची व्यवस्था केली आहे, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला होता.

Satej Patil
अखेर राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित अयोध्या दौरा ठरला; केली मोठी घोषणा

चंद्रकांत पाटील हे पुण्याला गेल्यामुळे त्यांचा कोल्हापूरशी संबंध राहिलेला नाही. बाहेरगावाहून सुमारे सहा ते सात हजार लोक घेऊन ते कोल्हापुरात आले होते. ही पोटनिवडणूक कोल्हापूरच्या स्वाभिमानाची लढाई होती आणि त्यात कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा विजय झाला आहे. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले. पुण्यातील गुंड घेऊन चंद्रकांत पाटील कोल्हापुरात फिरत होते, असा आरोपही सतेज पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com