'भारत जोडो' अभियानाला शह देण्यासाठीच भाजपने काँग्रेस तोडो अभियान सुरु केले

Satej Patil|Congress|BJP: कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.
Satej Patil
Satej Patilsarkarnama

कोल्हापूर : देशात सध्या माणसा-माणसांमध्ये दुरावा आणला जात आहे. त्यामुळे, कॉंग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उदयपूरच्या अधिवेशनात भारत जोडो अभियान सुरु केले आहे. मात्र, भारत जोडो या अभियानाला शह देण्यासाठीच भाजपने (BJP) काँग्रेस तोडो अभियान सुरु केले आहे का? अशी शंका कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज (ता.15 जून) व्यक्त केली. तर, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांच्यावर ईडीची (ED) कारवाई ही केवळ त्रास देण्यासाठीच असल्याचाही आरोप पाटलांनी केला. ते कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Satej Patil Latest Marathi News)

Satej Patil
भाजपच्या वर्चस्वाला कॉंग्रेसचा सुरुंग : १३ आमदार, ४ खासदार अन् २ मंत्री असूनही केला पराभव

पाटील म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi) व प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर ईडीकडून कारवाई केली जात आहे. पण, ही कारवाई केवळ त्रास देण्यासाठी केली जात आहे. आजचा तिसरा दिवस असून केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई होत आहे. सर्व माहिती दिली असतानाही मुद्दाम बोलावले जात आहे. केंद्र सरकारविरूध्द कोणीही बोलू नये, असे दडपशाहीचे वातावरण निर्माण केले जात आहे. केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या कारवाई ही देशाच्या लोकशाहीला धोकादायक आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना विरोधकांचा आवाज बंद करणे याचीही इतिहास नोंद होण्यासारखी घटना आहे, अश्या शब्दात पाटलांनी भाजपवर निशाणा साधला.

Satej Patil
विधान परिषद निवडणुकीची समीकरणे सांगलीत जुळणार? : जयंतरावांच्या गाडीत संजयकाका....

देशात ज्या एजंन्सी आहेत, त्यांचा कधीही गैरवापर झाला नाही. सीआयडीची कारवाई करण्याआधी आमची परवानगी घ्यावी, असा निर्णय घ्यावा लागत आहे. यापूर्वी देश म्हणून आणि देशाची घटना म्हणून असा कोणताही निर्णय घेण्याची गरज नव्हती. पण आता ती गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने अशा कारवाई थांबवल्या पाहिजेत. तरच लोकांचा लोकशाहीवर विश्‍वास वाढेल. भाजपकडून एजंन्सीच्या कारवाईचे समर्थन करत असतील तर हे समर्थन एजंन्सीकडून झाले पाहिजे. भाजपकडून कशासाठी होत आहे, असा सवाल उपस्थित करत पाटलांनी भाजपला खडेबोल सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com