Prithviraj Chavan News : थोरातांच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात आहे का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक वक्तव्य

Balasaheb Thorat News : भाजपला (BJP) स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही.
Balasaheb Thorat, Prithviraj Chavan News
Balasaheb Thorat, Prithviraj Chavan NewsSarkarnama

Karad News : भाजपला (BJP) स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडतात, असा टोला माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला लगावला.

ते कराडमध्ये बोलत होते. भाजपमध्ये आमदारांचे संख्याबळ बघितले तर निम्मी माणसे काँग्रेसचीच (Congress) आहेत. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्यावर अन्याय झाला, असे म्हटले आहे. त्यांची हायकमांड सखोल चौकशी करेल, असे त्यांनीही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat, Prithviraj Chavan News
Shivsena News : मोठी बातमी : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होणार?

चव्हाण म्हणाले, नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होणार आहे. ती गोष्ट गंभीर आहे. त्याची चौकशी वरिष्ठांकडून होत आहे. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत बैठक आहे. त्यात सविस्तर चर्चा होईल.

थोरात यांनी अन्याय झाला असे म्हटले असेल तर हायकमांड या प्रकरणाची चौकशी करेल. भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो, असे सूचक विधान त्यांनी केले. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात. भाजपमध्ये आमदारांच्या संख्याबळ बघितले तर निम्मी माणसे काँग्रेसचेच आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

Balasaheb Thorat, Prithviraj Chavan News
Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरातांची नेमकी नाराजी काय? पत्रातून महत्त्वाची माहीती आली समोर...

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी विधिमंडळातील काँग्रेसच्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावरुन काँग्रेस नेत्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com