शिर्डीकरांच्या मनसुब्यांवर काँग्रेस उपाध्यक्षांनी फिरवले पाणी

निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भुमिका घेतली होती.
शिर्डीकरांच्या मनसुब्यांवर काँग्रेस उपाध्यक्षांनी फिरवले पाणी
Shirdi NagarpanchayatSarkarnama

शिर्डी : शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या ग्रामस्थांच्या मनसुब्यांवर काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षांनी पाणी फिरवल आहे. शिर्डी नगरपंचायतीचे पालिकेत रुपांतर व्हावे यासाठी दाखल असलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी होती. त्यामुळे या निकालात नगरपालिकेचा आदेश झाल्यास पुन्हा निवडणुकीस सामोरे जाण्याची वेळ येऊ नये त्यामुळे सर्व पक्षांनी शहरवासियांशी बैठक घेवून या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भुमिका घेतली होती.

शिर्डीकरांच्या या भूमिकेला आज अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत पाठींबा मिळाला होता. त्यामुळे आजपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी नगरपंचायत निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Shirdi Nagarpanchayat
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

अर्ज भरण्यापूर्वी आरणे यांनी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यापुर्वी आरणे यांनी अर्ज भरु नये यासाठी अनेकांनी त्यांची मनधरणी केली, परंतु त्यात यश आले नाही. मात्र आता हे दोन्ही उमेदवार शेवटपर्यंत त्यांचे अर्ज ठेवणार की उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी माघार घेणार याकडे राजकीय वर्तुळासह शिर्डीतील जनतेचे लक्ष लागले आहे.

Shirdi Nagarpanchayat
दिलीप वळसे पाटलांची बाजी : जिल्हा बँकेत पहिले मंत्री बिनविरोध

लोकसंख्येची अट पूर्ण झाल्याने या नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करावे असा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने तीन वर्षापूर्वीच दिला होता. कार्यवाही होत नसल्याने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर आज अंतिम सुनावणी होती. दरम्यान शिर्डीत नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारने जारी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.