Congress : "पेशवाईसोबत राहायचे की शिवशाहीसोबत हे मुख्यमंत्री शिंदेंनी ठरवावे!"

Congresss : भाजपचे प्रवक्ते छत्रपतींसाठी जेव्हा माफीवीर असा अर्थ लावतात, तेव्हा ही पेशवाई आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

कऱ्हाड : पेशवाई आणि शिवशाही या दोन गोष्टींत विचार करायची वेळ आली आहे. पेशवाईने आणि शिवशाहीने काय दिले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे पेशवाई सोबत रहायचे की नाही हे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरवावे, असा सल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. आज पटोले यांनी साताऱ्यातील कऱ्हाड येथे पत्रकारांशी संवाद साधला.

कॉंग्रेसने भाजप 'हटाव संविधान बचाव' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज या रॅलीच्या समारोप होते. या कार्यक्रमात पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करण्याचे काम राज्यपाल करत आहेत. केंद्रातील भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तर कळसच गाठला. त्यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागीतली, असे वक्तव्य केले. त्याची जीभ का गळून पडली नाही, माहित नाही."

Eknath Shinde
Shivsena : ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या ; आता दोन बड्या नेत्यांना अँटी करप्शनची नोटीस!

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंनाही सल्ला दिला. शिंदे म्हणाले, पेशवाई आणि शिवशाही या दोन गोष्टींचा विचार करायची वेळ आली आहे. पेशवाईने आणि शिवशाहीने काय दिले हे जनतेला माहित आहे. भाजपचे प्रवक्ते छत्रपतींसाठी जेव्हा माफीवीर असा अर्थ लावतात, तेव्हा ही पेशवाई आहे हे स्पष्ट होत आहे. आता पेशवाई सोबत रहायचे की नाही हे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरवावे, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com