`तेव्हा काॅंग्रेस व राष्ट्रवादीला लाज वाटली नाही का`

मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण (Muslim Reservation) हवे होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने (NCP-Congress) ते दिले नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला.
`तेव्हा काॅंग्रेस व राष्ट्रवादीला लाज वाटली नाही का`
Asaduddin OwaisiSarkarnama

पुणे : एमआयएम पक्षाचे (MIM)अध्यक्ष असद्दुदीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सोलापूरात एमआयएमची मोठी सभा झाली. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्षतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच सोलापूरची सत्ता पक्षाकडे देण्याचे आवाहन केले.

Asaduddin Owaisi
ममतांच्या दिल्ली दौऱ्याचा मोठा गाजावाजा पण प्रवेश करणारे तिघेही माजी खासदार

राज्यात स्थापन करण्यात आलेल्या महाविकास आघाडी (State Government) सरकारवर हल्ला चढवताना ओवेसी म्हणाले, आपला परिवार वाचवण्यासाठी व घोटाळे लपवण्यासाठी शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करून धर्मनिरपेक्षता जमिनीत गाडली आहे. शिवसेनेला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणता आणि आम्हाला जातीयवादी म्हणता. शिवसेना कशी धर्मनिरपेक्ष आहे, हे शरद पवार आणि राहुल गांधींनी सांगावे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर मुस्लिम आरक्षणाबद्दल चकार शब्द हे पक्ष काढत नाहीत. मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी येत्या 11 डिसेंबरला मुंबईत धडक देऊ.

ओवेसींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करतांना शिवसेनाही भाजपसारखीच जातीयवादी असल्याची टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवले. मात्र, सत्ता स्थापनेसाठी हे सेनेसोबत एकत्र आले आणि मुस्लिमांना धोका दिला. तसेच, 1992 मध्ये काय झाले हे काँग्रेस-राष्ट्रवादी विसरले काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री ठाकरे सभागृहात म्हणतात की, बाबरी मशिद आम्ही पाडली. याची धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला याबाबात लाज वाटली नाही का, असा सवाल विचारत त्यांनी हल्ला चढवला. मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

Asaduddin Owaisi
एसटी संप : अनिल परबांच्या घराबाहेर राडा; घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न

सत्तेसाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 48 तासासाठी सकाळीच सत्ता स्थापन केली. मात्र, या दोघांमध्ये नवरदेव कोण आणि नवरी कोण,हे माहित नाही असा चिमटाही त्यांनी काढला. याबरोबरच आपल्या खिशात पेन ठेवा खिशातील कलम तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे आवाहनही ओवेसींनी उपस्थीतांना केले.

मुस्लिम आरक्षणाची बाजू मांडतांना ओवेसी म्हणाले, मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण हवे होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने ते दिले नाही. मुस्लिमांपैकी 83 टक्के नागरिकांकडे शेती नाही. तर, 62 टक्के मराठा समाजाकडे अडीच एकर जमिन आहे. ज्यांच्याकडे जमिन आहे, त्यांना आरक्षण दिले जात आहे. तर, ज्यांच्याकडे जाळण्यासाठी तेलही नाही, त्यांना आरक्षण नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच, अमरावती हिंसाचारावरून त्यांनी सरकारवर टीका करतांना म्हणाले की, अमरावतीमध्ये घडलेली घटना चुकीची आहे. कायदा आणि सुव्यवस्था या सरकारला राखता येत नसेल तर, कसले सरकार चालवताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला व राज्य सरकारवर टीका केली. तसेच, एमआयएम हिंसाचाराविरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in