उत्तरमध्ये जाधवांची विजयाकडे वाटचाल! जयश्रीताईंनी विजयाचं श्रेय दिलं तीन नेत्यांना...

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
Jayashree Jadhav and Satej Patil
Jayashree Jadhav and Satej Patil Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी बाविसाव्या फेरीअखेर निर्णायक 15 हजार मतांची आघाडी घेत भाजपच्या सत्यजित कदमांना (Satyajeet Kadam) पिछाडीवर टाकले आहे. विजयाची घोषणा होण्याआधीच जयश्री जाधवांनी आपल्या विजयाचे श्रेय तीन नेत्यांना दिले आङे. (Kolhapur by election 2022 result news)

जाधव यांनी विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास निकालाआधीच जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गट-तट बाजूला ठेवून महाविकास आघाडी एकत्र आल्याचा मला जास्त आनंद आहे. माझ्या या विजयाचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडीसोबतच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या जनतेला आहे. निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मोठं मनदाखवायला हवं होतं, पण त्यांनी दाखवलं नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून, आण्णांच्या माघारी त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळं आण्णांनी जे पेरलं, ते खरंच चांगलं उगवलंय. त्यामुळं आमचा विजय निश्चित होणार आहे. भाजपला कोल्हापूरच्या मतदारांनी नाकारल्यानं त्यांचा पराभव होणार आहे.

कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार होते. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला झाले असून, निकाल आज लागत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात मतमोजणी सुरु झाली आहे. टपाली मतदानासाठी एक आणि ईव्हीएम मशिनच्या मतदानासाठी 14 असे एकूण 15 टेबलवर आणि 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. यासाठी राखीवसह सव्वाशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत.

Jayashree Jadhav and Satej Patil
पवार अन् राष्ट्रवादीला मी कायम विरोध केला पण त्यांनीच मंत्री केलं! गुलाबराव पाटलांची कबुली

कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले आहे.

Jayashree Jadhav and Satej Patil
घरबसल्या ट्वीट करणारे रडीचा डाव खेळतात!

कोल्हापूर उत्तरच्या मैदानातील उमेदवार

जयश्री जाधव (काँग्रेस), सत्यजित कदम (भाजप), यशवंत कृष्णा शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी), विजय श्यामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहिद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी) आणि अपक्षांमध्ये सुभाष वैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत ऊर्फ संभाजी भोसले, मनिषा मनोहर कारंडे, अरविंद भिवा माने, मुस्ताक अजीज मुल्ला, करुणा धनंजय मुंडे, राजेश ऊर्फ बळवंत सत्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे या उमेदवारांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com