श्रीकांत देशमुखांच्या अडचणी वाढल्या; प्रकरण रुपाली चाकणकरांच्या कोर्टात

Shrikant Deshmukh | BJP : रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Shrikant Deshmukh - Rupali Chakankar
Shrikant Deshmukh - Rupali Chakankar Sarkarnama

मुंबई : महिल्याच्या फसवणुकीचे आरोप झालेले भारतीय जनता पक्ष (BJP) सोलापूरचे (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संबंधित महिलेने देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर पडायला भीती वाटत आहे, असे म्हणत पिडीतेने मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

या मेलमध्ये, महिला आयोगाने माझ्यासहीनिशीची तक्रार दखल पात्र गुन्हा (Crime) म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत वा माझी तक्रार नोंदवण्यासाठी मला मदत करावी असे म्हटले आहे. सदर संशयित आरोपी हा आर्थिक व राजकीयदृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे मला भीतीपोटी बाहेर जाऊन फिर्याद देणे शक्य न झाल्याने सदरची फिर्याद इमेलद्वारे दाखल करत आहे, असेही म्हटले आहे. या तक्रारीनंतर आता आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

चार दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे. देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित देशमुख यांनी त्या महिलेवर हनीट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा :

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणे पसंत केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला असून पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in