मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेणार!

संजय राऊत यांनी शाहू महाराज आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोबाईलवरून बातचित घडवून आणली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेणार!
Sanjay Raut-Shahu MaharajSarkarnama

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच कोल्हापुरात (Kolhapur) येऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची भेट घेणार आहेत, याबाबतची माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाहू महाराज यांची कोल्हापुरात न्यू पॅलेसमध्ये भेट घेतल्यानंतर पत्रकार बोलताना सांगितले. (Coming to Kolhapur, Chief Minister Uddhav Thackeray will meet Shahu Maharaj)

शिवसंपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत हे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी (ता. २८) शिवसैनिकांचा मेळावा घेतल्यानंतर आज (ता. २९ मे) ते शाहू महाराजांच्या भेटीसाठी न्यू पॅलेसमध्ये गेले होते. त्या भेटीनंतर राऊत हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

Sanjay Raut-Shahu Maharaj
अजित पवार म्हणाले,'आम्ही विसरत नाही, वेळ आली की प्रत्येकाची दखल घेतो'

खासदार संजय राऊत यांनी आज न्यू पॅलेस या ठिकाणी जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी राऊत यांनी शाहू महाराज आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोबाईलवरून बातचित घडवून आणली आहे. सुमारे पंधरा मिनिटांची ही भेट होती. राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन लावून दिला. मुख्यमंत्र्यांनी शाहू महाराजांना भेटण्यासाठी लवकरच आपण कोल्हापुरात येणार असल्याचे सांगितले आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शाहू महाराजांना राज्यसभा निवडणुकीसंदर्भातही माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली, त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे लवकरच कोल्हापुरात येऊन शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत.

Sanjay Raut-Shahu Maharaj
पूर्वीच्या सरकारमध्ये एकट्या भाजपचा त्रास होता; आता दोघांकडून होतोय : शिवसेना नेत्याची कबुली

या भेटीबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मला फोन करून सांगितले की, कोल्हापुरात आहात तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटून या, त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यावेळी त्यांनी मलाही शाहू महाराजांशी बोलायचे असल्याचे सांगितले होते. मी स्वतः कोल्हापुरात येऊन आपल्याला भेटेन. राज्यातील सामाजिक कार्यक्रमाला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद राहू द्या, अशी अपेक्षा ठाकरे यांनी शाहू महाराजांशी बोलताना व्यक्त केली. शाहू महाराजांशी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून नातं आहे. आम्ही एका आत्मयतेने येथे येतो, त्यामुळे इतकंच सांगतो की यामध्ये कोणतंही राजकारण नाही.

Sanjay Raut-Shahu Maharaj
'राज्यसभा पुरस्कृत उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना ‘हे’ सांगितलं होतं!'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली आहे,’ असा आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देत आहे. अशा पद्धतीने त्यांचा अपमान करू नका. चुकीच्या माहितीवर शाहू महाराज बोलणार नाहीत, ते फार ज्येष्ठ आहेत. ज्या घराण्याचा वारसा घेऊन ते पुढे जात आहेत, त्या ठिकाणी चुकीची माहितीच्या आधारावर बोलले जात नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in