सहकारमंत्र्यांच्या अभिनंदनाचा फलक झळकला; पण, तितक्याच वेगाने काढला...

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil लढत असलेल्या कऱ्हाड सोसायटी karad society मतदारसंघांकडे लागले आहे. येथे त्यांच्याविरोधात उंडाळकर काकांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर Udaysinh Patil Undalkar यांनी आव्हान उभे केले आहे.
सहकारमंत्र्यांच्या अभिनंदनाचा फलक झळकला; पण, तितक्याच वेगाने काढला...
Goleshwar Grampanchyat Bannerkarad Reporter

कऱ्हाड : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (मंगळवारी) आहे. पण, निकाल जाहीर होण्याआधीच कराडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयाचा फलक गोळेश्वर ग्रामपंचायतीने लावून सर्वांचे लक्ष वेधले होते. पण, तितक्याच वेगाने हा फलक काढण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष सहकारमंत्री बाळासाहेब पाटील लढत असलेल्या कऱ्हाड सोसायटी मतदारसंघांकडे लागले आहे. येथे त्यांच्याविरोधात उंडाळकर काकांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. पण, मध्यंतरीच्या काळात अनेक घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळे सहकार मंत्री विजयी होतील, असा दावा कराड तालुक्यातील मतदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून केला जात आहे.

Goleshwar Grampanchyat Banner
उदयनराजेंचे टेन्शन गेले, शिवेंद्रसिंहराजेंसह सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध

या निवडणुकीची मतमोजणी उद्या (मंगळवारी) असून सकाळी नऊपर्यंत निकालाचा कल अपेक्षित आहे. अद्याप मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्यास २४ तास असतानाच आज कराड तालुक्यात सहकारमंत्र्यांच्या अभिनंदनाचा फलक लागला होता. गोळेश्वर ग्रामपंचायतीने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयाचा फलक लावून त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. पण, तितक्याच वेगाने हा फलक काढण्यात आला. त्यामुळे सर्वांनी अश्चर्य व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in