उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनात सहकारमंत्र्यांचा 'सह्याद्री' प्रथम...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने Vasantdada Sugar Institute सह्याद्री साखर कारखान्यास sahyadri sugar factory प्रथम क्रमांकाचा First prize उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनात सहकारमंत्र्यांचा 'सह्याद्री' प्रथम...

Balasaheb Patil, Sharad Pawar

sarkarnama

कऱ्हाड : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे सन 2019-20 सालाचे ऑडिटेड जमा खर्च पत्रकांची छाननी केली. त्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा प्रति क्विंटल साखरेस आलेला रोखीचा उत्पादन खर्च रूपये 366.30 इतका असून तो राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन खर्चापेक्षा मोठ्या फरकाने कमी आहे.

<div class="paragraphs"><p>Balasaheb Patil, Sharad Pawar</p></div>
हिरवे पेन घेतले अन् आमदार बाळासाहेब पाटील मंत्री झाले

त्याचबरोबर साखर उत्पादन प्रक्रियेचा खर्च 813.75 प्रति क्विंटल असून तो ही राज्याच्या सरासरी साखर उत्पादन प्रकियेचा एकूण खर्चापेक्षा कमी असल्याचे छाननीत दिसून आले. कारखान्याच्या नयत मुल्य, भांडवलाच्या पाया निर्देशांकात भरीव वाढ झाल्याचेही दिसून येत असल्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने नोंद घेतली आहे. यासह विविध निकषांच्या आधारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने या कारखान्यास प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर केला आहे.

<div class="paragraphs"><p>Balasaheb Patil, Sharad Pawar</p></div>
सहकारमंत्र्यांचा 'सह्याद्री' ठरला साखर निर्यातीत अव्वल; नॅशनल फेडरेशनकडून द्वितीय पुरस्कार 

कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नियोजनबद्द मार्गदर्शनाखाली, कारखान्याने केलेल्या काटकसरीच्या कारभारामुळे कारखान्यास यापूर्वीही चारवेळा देशपातळीवरील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या संस्थेकडून मिळाले आहेत. व्हीएसआयने यापूर्वीही 2015-16 या सालासाठी उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार देवून गौरविलेले आहे. कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in