शिंदेंचा दे धक्का; सांगलीचे जिल्हाप्रमुख म्हणून आनंदराव पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब

आनंदराव पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता.
Shiv Sena Latest News, CM Eknath Shinde News, Anandrao Pawar News
Shiv Sena Latest News, CM Eknath Shinde News, Anandrao Pawar NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्के देणे सुरूच ठेवले आहे. ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या तसेच पदाचे राजीनामे देऊन समर्थन दिलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची शिंदे यांनी पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. सांगलीतही त्यांनी आनंदराव पवार यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या (Shiv Sena) जिल्हाप्रमुख (ग्रामीण) पदाचा राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीत शिवसेनेला खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याच आनंदराव पवार यांना त्रास दिल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर नाव घेऊन केला होता. त्यामुळे पवारांनी शिंदेंच्या प्रेमाची परतफेड केल्याची चर्चा होती. आता शिंदे यांनीही पुन्हा पवारांवरच विश्वास दाखवला आहे.

Shiv Sena Latest News, CM Eknath Shinde News, Anandrao Pawar News
Shiv Sena News : राहुल शेवाळेंना मिळणार 'गिफ्ट'? शिंदे पंतप्रधान मोदींकडे शब्द टाकणार

जिल्हाप्रमुख म्हणून संपूर्ण जिल्हाभर जोमाने कामाला लागून संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आदेश शिंदे यांनी पवारांना सोमवारी दिले. मुंबईतील हाॅटेल ट्रायडन्ट येथे झालेल्या बैठकीमध्ये शिंदे यांनी आमदार उदय सामंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पवारच जिल्हाप्रमुख असतील, अशी घोषणा केली. तसेच पुष्पगुच्छ देऊन आनंदराव पवार यांना शुभेच्छाही दिल्या.

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार असल्याचेही पवार यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर सांगितले होते.

Shiv Sena Latest News, CM Eknath Shinde News, Anandrao Pawar News
Shiv Sena : ठाकरेंना शिवसेना भवनातून हटविण्याचा शिंदे यांचा प्लॅन

पवार म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. कायम कट्टरच राहणार. परंतु, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय व निर्धार पवारांनी केला होता. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन शिवसैनिकांना न्याय देणार असल्याचेही ते म्हणाले होते. महाविकास आघाडीत असूनही शिवसैनिकांवर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचंड अन्याय झाला. आम्हाला महाविकास आघाडीची अभद्र युती मान्य नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंना आम्ही पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com