नगर ‘सेवक’ हवेत, नगर ‘भक्ष्यक’ नकोत !

पारनेर ( Parner ), कर्जत ( Karjat ) आणि अकोले नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.
निवडणुका
निवडणुका सरकारनामा

अहमदनगर : राजकारण बदलतय. नागरिकांना काहीही करून विकास हवाय. जर विकासाकडे लक्ष देता येत नसेल. नगरसेवक म्हणून मिरवायचे असेल तर त्या पदाला अर्थ तरी काय आहे हो ! युवा शक्तींनी सकाळकडे ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजेत. City 'servants' in the air, cities not 'eater'!

पारनेर ( Parner ), कर्जत ( Karjat ) आणि अकोले नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. झंझावती दौरे. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा. आयाराम-गयारामांची चलती. पळवापळवी, दहशतीचे राजकारण सुरू असल्याचे आरोप. असे चित्र प्रत्येक निवडणुकीत दिसून येते. त्यामध्ये नवे असे काही नाही. हे होतच राहाणार. मात्र या तिन्ही निवडणुकांकडे एक कटाक्ष टाकला तर असे दिसून येते की तरूण-तरूणींना राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो.

निवडणुका
पारनेर नगरपंचायतीसाठी 89 अर्ज दाखल : विजय औटींच्या पत्नी निवडणूक रिंगणात

युवा शक्तीचा विचार करावा लागेल गेल्या तीन दिवसापासून पारनेर, कर्जत आणि अकोले नगरपंचायत क्षेत्रातील तरूणांईने सकाळकडे मनोगत व्यक्त करताना ज्या अपेक्षा राज्यकर्त्यांकडून केल्या आहेत त्याचा कुठेतरी राज्यकर्त्यांना विचार हा करावाच लागेल. पोकळ घोषणाबाजी करून त्यांना थांबता येणार नाही. मतदानानंतर कोणताही पक्ष सत्तेवर येऊ दे ! त्यांना शहरासाठी योगदान हे द्यावेच लागेल. सकाळकडे युवाशक्तीने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत तो युवा शक्तीचा जाहीरनामाच आहे असे समजावे. निवडून आलो म्हणजे पुढील पाच वर्षे आपलीच. आपणाला पाहिजे तसा कारभार करता येईल हा गोडगैरसमज असेल तर तो डोक्यातून काढावा लागेल. आपल्या शहराचा प्रभागाचा विचार नगरसेवकांना करावाच लागेल.

निवडणुका
वैभव पिचड म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार...

राजकारणाचा तिटकारा नाही, पण...! आज काही शहरांकडे पाहिलं तर असं दिसून येतं की वर्षोनुवर्षे सत्ता भोगणार्या मंडळींना आपल्या शहराचा विकास करता आला नाही. जर इच्छा शक्ती असेल तर कठीण असे काहीच नाही. लोकसहभागातून किंवा सरकारच्या मदतीने पायलीभर नव्हे तर मोजक्या योजना तरी राबवता येतील की नाही ! सुरक्षा, उघडी गटारे, रस्त्यावर साचलेले कचर्यांचे ढीग, वाहतूक समस्या, फुटपाथवरील अतिक्रमने, स्वच्छ पाणी, आरोग्यासह उत्तम रस्ते , ग्रंथालये, स्पर्धापरिक्षेसाठी केंद्र आदी पालिका क्षेत्रात असायला हवेत. नव्याने मतदान करणारे मतदार तर याबाबत भरभरून बोलत आहेत. त्यांनी राज्यकर्त्यांकडून केलेल्या अपेक्षा चुकीच्या आहेत असे समजण्याचे मुळात कारणच नाही. राजकारणाविषयी त्यांना तिटकारा नाही. पण, जो चांगलं काम करेल त्याच्या मागं खंबीरपणे ही युवाशक्ती उभी राहते हे वेळोवेळी दिसून आले आहे. नगर सेवक हवेत नगर भक्षक नकोत. निवडून आलो की पहिले लक्ष्य टक्केवारीत न ठेवता विकास कसा करता येईल हे पाहिले पाहिजे.

निवडणुका
रोहित पवार व चंद्रकांत दादांत खडाजंगी

मोकळा श्वास हवा! नगरसेवक म्हणजे गळ्यात जाड सोन्याची माळ, पांढरे कपडे, उंची गॉगल, लाखो रुपयांचे बूट ही प्रतिमा वर्षानुवर्षे बनली आहे. याचा अर्थ सर्वच नगरसेवक तसे आहेत असेही नाही. मात्र पुढील पाच वर्षात माझा प्रभाग असा करेन की नागरिकांच्या तक्रारीच येणार नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक शहरात ज्येष्ठांचे प्रश्न आहेत. त्यांना मोकळा श्वास हवा. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

बार्शीकर, कोहलींचा आदर्श घ्या ! अहमदनगर शहराचा जेंव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा नवनीतभाई बारर्शीकरांची आठवण लोक आजही काढतात. ते नगरसेवक होते. नगराध्यक्ष होते. आमदार होते. त्यांनी शहरासाठी दिलेलं योगदान आजही लोक विसरत नाहीत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नगरसेवकांने किमान आपल्या प्रभागासाठी थोडजरी काम केलं तरी पुरेसे आहे. बार्शीकरानंतर आजपर्यंत नगराध्यक्ष, महापौर होऊन गेले त्यांची लोक का आठवण काढत नाहीत? बार्शीकरांचेच नाव का घेतले जाते !

निवडणुका
नगरपालिका निवडणुकीत कर्जतमध्ये राजकीय नाट्य आणि राम शिंदे संतापले; पाहा व्हिडिओ

कोहली पत्र्याच्या खोलीत राहिले! मुंबई महापालिकेत कधीही पराजित न झालेले एक नगरसेवक कै.सोहनसिंग कोहली हे मुंबईकरांसाठी नव्हे तर राज्यासाठी आदर्श निर्माण केला होता. साधीराहाणी आणि शेवटपर्यंत बेस्टने प्रवास करीत राहिलेला हा माणूस शेवटपर्यंत पत्र्याच्या खोलीत राहिला. प्रलोभनापासून कोसो दूर राहिले.आयुष्यात कोणत्याही टक्क्याला स्पर्श केला नाही. प्रभागातील लोकच त्यांना निवडून आणत. त्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा राज्यात शिवसेनेेची सत्ता होती.

मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांना कानी पडताच त्यांच्या अंत्यविधीसाठी ते जातीने हजर होते. जोशी त्यांच्याविषयी नेहमीच आदराने बोलत आणि त्यांचा आदर्श आपल्या पक्षातील नगरसेवकांनी घेण्याचे आवाहनही करीत. बार्शीकर किंवा कोहलीसारखं बननं आजकाल शक्य नाही. तशी अपेक्षा करणंही योग्य होणार नाही. पण किमान आपल्या प्रभागासाठी आपण करून दाखविले हे अभिमानाने नगरसेवकांना सांगता आले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in