नगरचे पालकमंत्री बदलणार : प्राजक्त तनपुरेंचे नाव आघाडीवर

हसन मुश्रीफ ( Hassan Mushrif ) हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) मोठे नेते आहेत.
prajakt tanpure
prajakt tanpureSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा हा राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा समजला जातो. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) मोठे नेते आहेत. कोल्हापूर राष्ट्रवादीची सर्वधुरा त्यांच्या खांद्यावर आहे. आगामी निवडणुका पाहता त्यांनी अहमदनगरचे पालकमंत्रीपद नको, असे पक्ष श्रेष्ठींना कळविले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्याच्या हलचालींना वेग आला आहे. City Guardian Minister to change: Prajakt Tanpur's name on the forefront

अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाहता संपूर्ण जिल्ह्याला वेळ देणे मुश्रीफ यांना शक्य होत नाही. कोल्हापूरवरून अहमदनगरला येणे त्यांना दरवेळी शक्य होत नाही. यातच कोल्हापूर जिल्ह्यात दूध संघापासून अनेक निवडणुका या वर्षात होणार आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला मुश्रीफ यांची गरज आहे. हे पाहता मुश्रीफ यांनी पालकमंत्री पद नको अशी घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली होती.

prajakt tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, माझ्यावर इडी संदर्भात टीका करणाऱ्याला माझं नावच कसं घेता आलं...

यात अहमदनगर जिल्ह्यातील निवडणुकाही सुरू झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात हे वर्ष निवडणुकांचे आहे. या निवडणुकांत पुरेसा वेळ देऊ शकतील असे पालकमंत्री आवश्यक आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. हे पाहता राष्ट्रवादीचा एखादे मंत्री अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात आज सायंकाळी मंत्रीमंडळाची एक बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या विषयावरही चर्चा सुरू असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. पालकमंत्रीपदासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुषविले होते. मात्र त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी आहे. हे पाहता तनपुरे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

prajakt tanpure
प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी रंगली

अहमदनगर जिल्हा नियोजनची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या ( गुरुवारी ) होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपदा बदलावे अशी मागणी हसन मुश्रीफ यांनीच केली होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. आगामी तीन ते चार दिवसांत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ हेच अध्यक्ष स्थान भूषवतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com