आमचे विरोधक हातात नसणाऱ्या गोष्टींची आश्वासने देतात : सोपलांचा राऊतांना टोला

बार्शीच्या नागरिकांनी विरोधकांच्या फसवणुकीला बळी पडू नये : दिलीप सोपल
आमचे विरोधक हातात नसणाऱ्या गोष्टींची आश्वासने देतात : सोपलांचा राऊतांना टोला
Rajendra Raut-Dilip SopalSarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीकरांच्या मतांवर डोळा ठेवून अल्पसंख्याक समाजाला प्रलोभने दाखविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. ओपन स्पेस प्लॉटधारकांच्या मालकीचे असतात. तेथे शासकीय निधी खर्च करता येत नाही. तेथेच विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून नारळ फोडणे सुरु आहे, त्या फसवणुकीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पत्रकार परिषदेतून केले. (Citizens of Barshi should not fall prey to deception of opposition : Dilip Sopal)

माजी मंत्री सोपल यांनी नगरपरिषदेचे सत्ताधारी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. शहरातील ओपन स्पेसच्या जागा विविध समाजाला देतो, आमदार कोट्यातून समाजमंदीर बांधून देतो, या नावाखाली भूमिपूजनाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. स्थानिक नगरपरिषद प्रशासनाला नियम माहित असतानाही केवळ दबावापोटी चुकीचे विषय मंजूर करुन घेत आहेत. आम्ही 2014 मध्ये सत्तेत असताना ओपन स्पेस सुरक्षित, देखभाल, स्वच्छतेसाठी, दुरुस्तीसाठी लायन्स क्लब व इंडियन रेडक्रॉस सोसायटीला देण्याचा ठराव केला होता. मात्र तत्कालीन विरोधकांनी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे अपील करून ते ठराव रद्द केले होते, याचीही आठवण सोपल यांनी या वेळी करून दिली.

Rajendra Raut-Dilip Sopal
काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे : मुंबई, विदर्भातील दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू?

निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस ही नियमित बाब झाली आहे. घरपट्टी व्याज माफ करतो, नियमित पाणी पुरवठा करतो, असा टोला विरोधकांना लगावून हातात नाहीत त्या गोष्टींची आश्वासने ते देतात अन् ओपन स्पेसच्या जागा समाजाला देण्याच्या नावाखाली सक्रिय झाले आहेत. सोपल पुढे म्हणाले की, सोसायटी, असोसिएशन यांनाच ओपन स्पेस जागेचा वापर करण्यासाठी, अनुज्ञेय बांधकाम करण्यासाठी मुभा आहे. इतरांना त्या जागेचा वापर करता येत नाही.

Rajendra Raut-Dilip Sopal
'गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत सोडा'

तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी त्यावेळी पारदर्शी निर्णय दिला होता. जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी 25 नोव्हेंबर 2021 रोजी परिपत्रक काढून शासकीय निधी, खासदार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत करावयाची कामे ही शासकीय जागेवर करणे आवश्यक आहे. जागेच्या मालकीबाबत, खात्री करणेबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत, त्या आदेशाच्या प्रती माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पत्रकार परिषदेत दिल्या.

Rajendra Raut-Dilip Sopal
कोल्हापूरात महाडिकांचे वर्चस्व काल होते, आज आहे आणि उद्याही राहणार

पत्रकार परिषदेस सुधीर सोपल,योगेश सोपल,नागेश अक्कलकोटे,नगरसेवक बापू जाधव,अण्णा पेठकर, नागेश नान्नजकर, माजी नगरसेवक वाहिद शेख, शशिकांत गव्हाणे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in