Satara : चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका.. म्हणाल्या, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय....

Chitra Wagh महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी चित्रा वाघ आज साताऱ्यात आल्या होत्या.या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Sanjay Raut, Chitra Wagh
Sanjay Raut, Chitra Waghsarkarnama

Satara News : विरोधक बोलत राहतील त्यांच्या गोष्टी फार काय मनावर घेऊ नका. ते फ्रस्टेशनमध्ये असून त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एक जण तर 103 दिवस तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याप्रमाणे वाट्टेल ते बोलत आहेत, अशी जहरी टीका भाजपच्या BJP महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ Chitra Wagh यांनी संजय राऊतांसह विरोधकांवर केली आहे.

महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी चित्रा वाघ आज साताऱ्यात आल्या होत्या.या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. चित्रा वाघ म्हणाल्या, विरोधक वेळोवेळी भाजप वर छत्रपतींचा अपमान होत असल्याचे आरोप करता असतात या प्रश्नावर बोलत असताना भाजप च्या नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

चित्रा वाघ म्हणाल्या, विरोधक बोलत राहतील त्यांच्या गोष्टी फार काय मनावर घेऊ नका. ते फ्रस्टेशनमध्ये आहेत. त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एक जण तर 103 दिवस तुरुंगात जाऊन आले आहेत. (संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली) त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते वाट्टेल ते बोलत आहेत.

Sanjay Raut, Chitra Wagh
Satara : पेंटिंगच्या वादावर पडदा; राजघराणे, देसाईंच्या घराण्याचे सलोख्याचे संबंध...

. (संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली) त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते वाट्टेल ते बोलत आहेत. सगळ्यांचा मानसन्मान भारतीय जनता पक्ष वेळोवेळी करत आला आहे. त्यामुळे या गोष्टींना फारसे महत्व देण्याची गरजेचे आहे, असे मला वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Sanjay Raut, Chitra Wagh
Shivendraraje Bhosale : औरंगजेबाचे छायाचित्रे झळकवणाऱ्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in