Karad : मुख्यमंत्री दौरा अन् स्वाभिमानीचा चक्का जाम....

Raju Shetty राजू शेट्टी यांनी उद्या (शुक्रवारी) राज्यभर चक्का जाम Chakka Jam आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Raju Shetty, Eknath Shinde
Raju Shetty, Eknath Shindesarkarnama

कऱ्हाड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध खात्याचे मंत्री हे उद्या (शुक्रवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच उसाला साडेतीन हजार रूपये भाव मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि या आंदोलनाचा मोठा ताण आहे.

आज मध्यरात्रीपासूनच सातारा जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर जिल्ह्याचे सुपूत्र एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी शासनाकडून तयारी सुरू आहे. कराड येथील विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदा ज्‍येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी अभिवादन करतील.

त्यांच्यासमवेत उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार, आमदार व मान्यवर असतील.

Raju Shetty, Eknath Shinde
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनासह अन्य विविध विकासकामांचे उद्‌घाटन, भूमिपूजन होतील. त्यासाठी दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये द्यावेत, यंदाच्या उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी दोन दिवस लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन केले होते.

Raju Shetty, Eknath Shinde
Karad : पृथ्वीराज चव्हाणांच्या विकास कामांचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्‍घाटन 

त्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. विविध पातळीवरची आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याचा आरोप करून राजू शेट्टी यांनी उद्या (शुक्रवारी) राज्यभर चक्का जाम आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन उद्या होणार आहे. या आंदोलनाचाही ताण पोलिस व जिल्हा प्रशासनावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दौरा आणि आंदोलन हे दोन्ही हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यादृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू आहे.

Raju Shetty, Eknath Shinde
Karad : सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली हे वास्तवच...पृथ्वीराज चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in