Mahabaleshwar : बेकायदेशीर बांधकाम असलेल्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुक्काम... सचिन मोहिते

महाबळेश्वरात Mahabaleshwar दुसरी अनेक हॉटेल्स Another Horels असताना मुख्यमंत्री CM Shinde याचा हॉटेलमध्ये मुक्कामी का राहिलेत, असा प्रश्न मोहिते Sachin Mohite यांनी उपस्थित केला आहे.
CM Eknath Shinde, Sachin Mohite
CM Eknath Shinde, Sachin Mohitesarkarnama

सातारा : बेकायदेशीर बांधकाम असलेल्या महाबळेश्वरातील हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असून या हॉटेलच्या या बांधकामाविषयी वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. बेकायदेशीर बांधकाम असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी राहून मुख्यमंत्र्यांकडून या बांधकामांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात सचिन मोहितेंनी काढलेल्या निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांचा मुक्काम एका हॉटेलमध्ये आहे. बेकायदेशीर बांधकामे असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. या हॉटेलच्या बेकायदेशीर बांधकामांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार तक्रारी होऊनही जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नाही.

CM Eknath Shinde, Sachin Mohite
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे विश्रांतीसाठी सहकुटुंब महाबळेश्वरात ....

यासंदर्भात विविध पुरावे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावरून अतिक्रमणे काढण्याचे आदेश झालेले आहेत. असे असतानाया हॉटेलची बांधकामे होत आहेत. महाबळेश्वरात दुसरी अनेक हॉटेल्स असताना मुख्यमंत्री याचा हॉटेलमध्ये मुक्कामी का राहिलेत, असा प्रश्न उपस्थित करून श्री. मोहिते म्हणाले की, त्यांच्या या मुक्कामातून हॉटेलच्या बेकायदेशीर बांधकामाना अभय देण्याचा प्रयत्न होत नाही ना, असा आरोपही श्री. मोहिते यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com