Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे विश्रांतीसाठी सहकुटुंब महाबळेश्वरात ....

पावसाळी अधिवेशनाचे Pavsali Adhiveshan सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde शुक्रवारी रात्री उशीरा महाबळेश्वरला Mahabaleshwar दाखल झाले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama

सातारा : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब महाबळेश्वरला विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा खासगी दौरा असल्याने महाबळेश्वरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५० आमदारांनी स्वतंत्र गट तयार केला. तसेच सत्तेतून बाहेर पडत भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटावर सर्वच स्तरातून टिकेची झोड उठली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी दिली गेली. तर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली. या नव्या सरकारचे नवे मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिलेच पावसाळी अधिवेशन झाले.

CM Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचा ताफा पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकला अन्...

पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री उशीरा महाबळेश्वरला दाखल झाले. ते दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर सहकुटुंब महाबळेश्वरात दाखल झाले आहेत. हा खासगी दौरा असल्याने ते कोणालाही भेटणार नाहीत. तसेच पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com