हा आनंदच न्यारा.. शाळकरी मुलांच्या जल्लोषामुळे खुद्द मुख्यमंत्री गाडीतून उतरतात तेव्हा...

Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांना पाहून शाळकरी विद्यार्थीही भारावले...
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSarkarnama

कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता.२५ नोव्हेंबर) राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील समाधीस्थळी जावून त्यांना अभिवादन केले.

दरम्यान, त्यानंतर ते पुढील कार्यक्रमाकडे रवाना होत असताना रस्त्यात शाळकरी मुलींच्या जल्लोष ऐकून मुख्यमंत्र्यांनी चक्क आपला ताफा थांबवला आणि गाडीतून उतरत विद्यार्थ्यांशी हस्तादोंलन केले. त्यामुळे विद्यार्थी आणि गावकरी भारावून गेले होते. (Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री शिंदेंच्या (CM Eknath Shinde) दौऱ्यादरम्यान सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यासह अनेक कार्यकर्त्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री कऱ्हाडमधून जात असताना मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी रामविलास लाहोटी कन्याशाळेजवळ शाळेतील मुलीही थांबल्या होत्या.

Eknath Shinde Latest News
ग्रामपंचायत निवडणूक : कॉंग्रेसमध्ये ‘भारत जोडो’चा उत्साह; शिंदे-ठाकरे गटांची अग्निपरीक्षा

मुख्यमंत्र्यांचा ताफा आपल्या जवळून जात असल्याने उपस्थित सुमारे शेकडो मुलींनी मुख्यमंत्र्यांचा ताफा बघून आरोळ्या ठोकल्या. त्यानंतर या चिमुकल्या मुलींचा जल्लोष ऐकून मुख्यमंत्र्यांनी गाडीतून उतरत थेट विद्यार्थ्यांशी हस्तादोंलन केले. मुख्यमंत्र्याचा हा साधेपणा पाहून या चिमुकल्या मुली भारावून गेल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती. शाळकरी मुलींसोबत काही वेळ थांबल्यावर मुख्यमंत्री शिंदे हे पुढे निघाले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी सस्त्यात शाळकरी चिमुकल्यांना दिलेल्या भेटीवरून त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मुळ सातारा जिल्ह्यातीलच असल्याने त्यांचा आपल्या जिल्ह्याशी अजूनही नाळ असल्याचे दिसून आले. तर त्यांचा साधेपणा उपस्थितांना भावला. याआधी देखील त्यांनी अगदी साधेपणाने आपल्या गावी अन् शिवारात जात शेतात ते रमलेले आपण बघितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com